नितीन अग्रवाल ।नवी दिल्ली : रुग्णांच्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सोमवारी उत्तरप्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे. गोरखपूरच्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आॅक्सिजनअभावी ६३ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारवर टीका होत आहे.मानवाधिकार आयोगाने मीडियातील वृत्ताची स्वत: हून दखल घेत नोटीस जारी केली आहे. यातील जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाई करत चार आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत. आॅक्सिजनचा पुरवठा करणाºया कंपनीची थकीत रक्कम न दिल्याने या कंपनीने पुरवठा बंद केला. परिणामी या बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी उत्तरप्रदेश सरकारने रविवारी हा दावा फेटाळत हे मृत्यू मेंदूज्वरामुळे झाल्याचे म्हटले आहे.उत्तरप्रदेशातील आरोग्य विभाग, हॉस्पिटल प्रशासन यांचा हा बेजबाबदारपणा असल्याचेही मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे. लखनौमध्ये ९ ते ११ आॅगस्ट या काळात झालेल्या शिबिरात आपण मेंदूज्वराचा मुद्दा उपस्थित केला होता, असे मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.>पाच कोटींची मदतगोरखपूर येथील घटनेने चिंतित होऊन भाजप खासदार वरुण गांधी यांनी सुलतानपूर जिल्हा रुग्णालयात बालरोग विभाग सुरु करण्यासाठी खासदार निधीतून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. उपचारावाचून कोणतेही बालक वंचित राहू नये यासाठी १०० खाटांचा स्वतंत्र विभाग सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गोरखपूरमध्ये आणखी सहा मुलांचा मृत्यूगोरखपूर : येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये गत काही दिवसांत ६० मुलांचा मृत्यू झाला असतानाच शनिवार ते सोमवारपर्यंत तीन दिवसांत आणखी ६ मुलांचा मेंदुज्वराने मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. पुष्कर आनंद यांनी ही माहिती दिली.
मानवाधिकार आयोगाची यूपी सरकारला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:57 AM