उज्जैन - येथे वर्दळीच्या रस्त्यावरील फूटपाथवर खुलेआम महिलेवर बलात्कार होत असताना, लोक मात्र याचा व्हिडीओ बनविण्यात व्यस्त असल्याचा धक्कादायक आणि मानवतेला कलंक लावणारा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत आरोपीला अटक केली आहे.
पोलिस आता बलात्काराचा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. व्हिडीओ बनविणाऱ्या तरुणाने व्हिडीओ उज्जैनच्या काही सोशल मीडिया ग्रुपवर अपलोड केला होता. त्यानंतर तो व्हायरल झाला.
जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि लोकांची चौकशी करून पोलिस तरुणाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या तरुणाचा मोबाइल नंबर ट्रेस केला असून, त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक प्रदीप शर्मा म्हणाले की, ज्याने व्हिडीओ बनवला त्याचा शोध सुरू आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान या प्रकरणी पोलिसांवर टीका होत आहे.
तिला दारू पाजली, नंतर बलात्कार केलापीडित महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करते. आरोपीचे नाव लोकेश असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. कोयला फाटकजवळ आरोपी तिला भेटला होता. लग्नाच्या बहाण्याने त्याने तिला आधी दारू पाजली आणि नंतर दारूच्या नशेत तिच्यासोबत गैरकृत्य केले. यानंतर तो धमकावून पळून गेला.
आरोपी बलात्कार करत राहिला, कोणीतरी व्हिडीओ बनवलाकोयला फाटक हा उज्जैनमधील सर्वात वर्दळीचा परिसर आहे. याच रस्त्यावर चरक हॉस्पिटल, पेट्रोल पंप आणि दारूचे दुकान आहे. घटनेदरम्यान कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवला. मात्र, आरोपीला रोखण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तो भाजी विकण्याचे काम करत होता.
काँग्रेसची टीका-या घटनेवरून काँग्रेसने पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.-प्रियांका गांधी यांनी म्हटले की, उज्जैनच्या पवित्र भूमीवर अशा घटनेमुळे मानवता कलंकित झाली आहे.-आज संपूर्ण देश सुन्न असून, आपला समाज कुठे चालला आहे?
आजारी पतीला घेऊन जाताना रुग्णवाहिकेतच झाला बलात्काराचा प्रयत्न, पतीला खाली फेकलेउत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून आपल्या आजारी पतीसोबत सिद्धार्थनगरला जात असलेल्या महिलेचा रुग्णवाहिकेत रुग्णवाहिकेच्या चालकाच्या सहकाऱ्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.ही महिला लखनौला परतल्यानंतर तिने आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपी रुग्णवाहिका मदतनीसास अटक करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णवाहिकाही जप्त करण्यात आली आहे. रुग्णवाहिका चालक अद्याप फरार आहे.महिलेने रुग्णवाहिका चालकावर पतीचा ऑक्सिजन मास्क काढून त्याला रुग्णवाहिकेबाहेर फेकल्याचा आरोप केला आहे. या घटनेत महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे.