शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

अंजनेरी शिवारात दीड लाखाचा मद्यसाठा जप्त

By admin | Published: September 03, 2015 11:52 PM

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरकडे येणारा अवैध दारूसाठा पोलिसांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात एका मारुती व्हॅनमधून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरकडे येणारा अवैध दारूसाठा पोलिसांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात एका मारुती व्हॅनमधून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे अवैधरीत्या दारूसाठा येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय उंबरकर, त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पो. ना. महेश घायतड, अशोक काळे यांनी बेजे फाट्यावर सापळा रचून यावेळी नाशिककडून येणारी मारुती व्हॅन (एम.एच.-१५-सी.एस.८७९५) थांबविली असता मोठ्या प्रमाणावर देशी दारू व इंग्लिश दारू गाडीत आढळून आली.
सदर व्हॅनला त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. याठिकाणी मारुतीची चौकशी केली. या मारूती व्हॅनमधून देशी दारू (प्रिन्ससंत्रा) २१६० बाटल्या. मॅगडोल-१८, ब्लॅक डी.एस.पी.१५, ऑफिसर चॉइस-४०, बॅकपायपर-४० आदिंसह ५० हजारांचा मुद्देमाल सापडला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रकाश कन्हैयालाल खैमानी यास अटक केली आहे. दरम्यान हा अवैध दारूसाठा कुठून आला व कुठे जाणार होता याचा पोलीस तपास करीत आहे.
----------
कॅप्शन
पोलिसांनी पकडलेल्या अवैध दारूसाठा प्रसंगी उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, हवालदार संजय उंबरकर, पो. ना. महेश घायतड, अशोक काळे, राजू दिवटे आदि.
----