शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

शेकडो सेवा महागणार

By admin | Published: June 01, 2016 4:49 AM

केंद्रीय अर्थ संकल्पात मंजूर झालेला वाढीव सेवाकर व कृषी कल्याण अधिभार लागू होत असल्याने हॉटेल, टेलिफोन, विमान आणि रेल्वे प्रवास यासह अनेक सेवा बुधवार १ जूनपासून आणखी महाग होणार आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ संकल्पात मंजूर झालेला वाढीव सेवाकर व कृषी कल्याण अधिभार लागू होत असल्याने हॉटेल, टेलिफोन, विमान आणि रेल्वे प्रवास यासह अनेक सेवा बुधवार १ जूनपासून आणखी महाग होणार आहेत. वित्तमंत्री अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या व संसदेने मंजूर केलेल्या अर्थ संकल्पात सेवाकरात (शिक्षण उपकरासह) १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के एवढी वाढ करण्यात आली. कृषी कल्याण अधिभार नावाचा ०.५ टक्के एवढा नवा अधिभारही सेवाकरावर लावला. या दोन्हींची अंमलबजावणी आता होत आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी लावलेला अधिकार आधीपासूनच लागू आहे. त्यामुळे ज्या सेवांना सेवाकर लागू आहे, अशा सेवांवर १ जूनपासून नवा अधिभार धरून एकूण १५ टक्के कर लागू होईल. सेवाकराच्या नकारात्मक यादीत समावेश असलेल्या व पूर्णपणे वगळलेल्या ४७ सेवा वगळून सर्वच सेवांना हा वाढीव सेवाकर व अधिभार लागू होईल. या करवाढीमुळे येत्या वर्षभरात ग्राहकांवर सुमारे २०,६०० कोटी रुपयांचा बोजा पडेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अर्धा टक्का या दराने लागू केल्या जाणाऱ्या कृषी कल्याण अधिभारातून मिळणाऱ्या सर्व रकमेचा विनियोग फक्त शेती सुधारणा व शेतकरी कल्याणाच्या कामांसाठी केला जाईल, असे वित्तमंत्र्यांनी या आधीच जाहीर केले आहे.हॉटेलमधील जेवण, मोबाइल फोन महागणार विमान आणि रेल्वे प्रवासातही खिशाला झळ १० लाखांवरील चारचाकी खरेदीसाठी एक टक्का अतिरिक्त कर ज्वेलरी खरेदीवर अतिरिक्त कर लागणार नाही महागणाऱ्या सेवारेल्वे, विमान, बँकिंग, विमा, जाहिरात, आर्किटेक्चर, बांधकाम, क्रेडिट कार्ड, इव्हेंट मॅनेजमेंट, टूर आॅपरेटर्स यांसह इतरही अनेक सेवांचा समावेश असेल. प्रवाशांना दिलासारेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवरून १ जूनपासून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्या जाणाऱ्या तिकिटांवर, सध्या आकारला जाणारा प्रति तिकीट ३० रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार नाही, असे रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.