किशोर इंदोरकर मालेगाव कॅम्पचिखलओहोळ गण यंदा इतर मागासवर्गीय महिला राखीव झाला असल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. या गणामध्ये सुमारे २३ हजार मतदार व १२ गावांचा समावेश आहे.२३ हजार मतदारांमध्ये सुमारे १४ हजाराहून अधिक मराठा, त्यापाठोपाठ माळी व इतर समाजाचांचा समावेश असल्याने मराठा समाजाची मते उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहे. त्यानुसार आरक्षणाप्रमाणे तोडीला तोड ताकदवान उमेदवारांची शोध मोहीम सुरू आहे. गणामध्ये विद्यमान सदस्य भाजपात दाखल झाल्याने येथे शिवसेना, भाजपा, मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात लढत होणार आहे.गत वेळेस मनसेचे भामरे यांनी शिवसेनेचे सुनील चिकणे यांना पराभूत करीत विजय मिळविला होता. या गणात विद्यमान सदस्य पोपट भामरे यांनी आपल्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण ठोस विकासकामे झाले नसल्याचा आरोप मतदार करतात. गणात शासकीय निधीतून कच्चे रस्ते, मुरुम टाकण्यासह पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न भामरे यांनी केले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भामरे यांनी सेनेचे चिकणे यांचा पराभव केला. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला चिखलओहोळ गण प्रतिष्ठेचा झाला आहे.
गणात उमेदवारांसाठी शोधाशोध
By admin | Published: February 02, 2017 11:20 PM