अहमदाबाद - गुजरात हायकोर्टाने एका पत्नीने मृत्यूच्या दारात असलेल्या तिच्या पतीचे स्पर्म सुरक्षित ठेवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कोर्टाने या महिलेच्या पतीचे स्पर्म (sperm) सुरक्षित करण्यास परवानगी दिली आहे.या महिलेच्या पतीला मे महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून तो व्हेंटिलेटरवर आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी त्याच्याकडे जीवनातील अखेरचे तीन दिवस शिल्लक असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यानंतर या महिलेने कोर्टात धाव घेतली होती. (husband is affected from covid-19, wife expressed her desire to become a mother from husbands sperm, Now court gave permission)
मिळालेल्या माहितीनुसार पत्नीने कोर्टाला सांगितले की, मी माझ्या पतीच्या स्पर्मपासून आई होऊ इच्छित आहे. मात्र वैद्यकीय कायदे मला याची परवानगी देत नाहीत. आम्हा दोघांच्या प्रेमाची शेवटची खूण म्हणून मला माझ्या पतीचे स्पर्म देण्यात यावे. माझ्या पतीकडे खूप कमी वेळ आहे. ते गेल्या दोन महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, कोर्टाने पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर सहानुभूतीपूर्वक विचार करून तिला स्पर्म घेण्याची परवानगी दिली.
याबाबत पत्नीने सांगितले की, चार वर्षांपूर्वी आम्ही दोघे कॅनडामध्ये एकमेकांच्य संपर्कात आलो होते. त्यानंतर गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात आमचा विवाह झाला. विवाहाला चार महिने उलटल्यावर सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने आम्ही भारतात आलो. येथे मे महिन्यात माझ्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्या फुप्फुसात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने ते निकामी झाले. ते दोन महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान तीन दिवसांपूर्वी डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा होण्याची कुठलीही शक्यता नसून त्यांच्याकडे आता केवळ तीन दिवसांचाच वेळ आहे, अशे माझ्या नातेवाईकांना सांगितले.
त्यानंतर मी माझ्या पतीच्या पतीच्या स्पर्मपासून आई होऊ इच्छिते, असे डॉक्टरांना सांगितले. मात्र डॉक्टरांनी पतीच्या परवानगीशिवाय स्पर्म सँपल घेता येणार नसल्याचे सांगितले. मात्र मी हिंमत हरले नाही. माझ्या सासू सासऱ्यांची मला साथ लाभली. आम्ही हायकोर्टात धाव घेतली. तेव्हाच आम्हाला कळाले की माझ्या पतीकडे केवळ २४ तासांचाच वेळ आहे.
ती पुढे म्हणाली की, आम्ही सोमवारी कोर्टात याचिका दाखल केली. मंगळवारी ती सुनावणीसाठी आली. त्यानंतर १५ मिनिटांतच कोर्टाने हा निर्णय दिला. मात्र रुग्णालयाने आम्ही या निर्णयाचा अभ्यास करत असल्याचे सांगितले. कोर्टाने रुग्णाचे स्पर्म मिळवून ते सुरक्षित करण्याचे आदेश रुग्णालयाला दिले आहे. मात्र रुग्णालयाने पुढील आदेशापर्यंत आर्टिफिशियल इन्सेमनेशनाची परवानगी दिलेली नाही. आता रुग्णालय गुरुवारी याबाबत पुढील सुनावणी करणार आहे.