शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
6
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
7
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
8
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
9
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
10
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
11
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
13
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
14
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
15
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
16
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
17
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
18
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
20
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ

घरातून जोडपं चालवत होतं अश्लील व्हिडिओचं रॅकेट; ईडीच्या छाप्यानंतर २२ कोटी कमावल्याचे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 09:30 IST

नोएडामध्ये ईडीने टाकलेल्या छाप्यात श्लील व्हिडीओ बनवणाऱ्या एका जोडप्याचा पर्दाफाश झाला आहे.

Noida ED Raid: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या एका जोडप्याचा पर्दाफाश केला. हे जोडपं अश्लील व्हिडिओ बनवून ते पॉर्न साइटला विकत होते. ईडीने नोएडा येथील सबडिगी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकला. ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजे फेमा अंतर्गत करण्यात आली. तपासात समोर आले की उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव त्यांच्या घरातून अ‍ॅडल्ट वेबकॅम स्टुडिओ चालवत होते. छाप्यादरम्यान मॉडेल्स घरी शो करताना आढळून आल्या आणि आठ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.

नोएडामधील एका घरामध्ये एक आलिशान स्टुडिओ उभारुन मॉडेल्ससह नग्न व्हिडिओ शूट केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.ईडीचे पथक छापा टाकण्यासाठी या घरी तेव्हा एका मोठ्या आणि घाणेरड्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला. नोएडातल्या जोडप्याने घरातून विदेशी पॉर्न वेबसाइटला अश्लील व्हिडिओ आणि वेबकॅम शो विकून करोडो रुपये कमावले आहेत. फेसबूक पेजच्या माध्यमातून आरोपी मॉडेल्सना भरघोस पगाराचे आमिष दाखवून फसवायचे. ईडीने छापा टाकून तीन मॉडेल्सना अटक केली. 

श्रीवास्तव दाम्पत्याने मिळून 'सबडीझी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड' नावाची कंपनी स्थापन सुरु केली होती. ही कंपनी ॲडल्ट व्हिडिओंचा व्यवसाय करत होती. या दाम्पत्याने 'टेक्निअस लिमिटेड' या सायप्रस कंपनीसोबत करार केला होता. 'एक्सहॅमस्टर' आणि 'स्ट्रिपचॅट' सारख्या पॉर्न वेबसाइट टेक्निअस लिमिटेडद्वारे चालवल्या जातात. दोघे पती पत्नी नोएडामध्ये पॉर्न बनवून परदेशी वेबसाइटवर पाठवायचे आणि त्या बदल्यात तिथून त्यांच्या खात्यात मोठी रक्कम पाठवली जायची.

श्रीवास्तव दाम्पत्याच्या खात्यात परदेशातून सतत मोठी रक्कम येत होती. ही कंपनी जाहिरात, मार्केट रिसर्चचे काम करत असल्याचे दाखवण्यात आलं होतं. मात्र फेमा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे कळताच ईडीने तपास सुरु केला. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. कंपनीच्या संचालकांच्या खात्यांमध्ये परदेशातून आलेले १५.६६ कोटी रुपये सापडले आहेत. याशिवाय नेदरलँडमध्येही एक खाते सापडलं ज्यामध्ये ७ कोटी रुपये पाठवण्यात आले होते. ही रक्कम आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डद्वारे भारतात रोख स्वरूपात काढण्यात आली. आतापर्यंत २२ कोटींहून अधिकची कमाई सापडली आहे.

फेसबुकच्या माध्यमातून हे जोडपे मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींना फसवत होतं. यासाठी फेसबुक आणि अन्य काही संकेतस्थळांवर जाहिराती देण्यात आल्या होत्या. जाहिरात पाहून आलेल्या मुलींना जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात पाडलं गेलं. व्हिडिओंमधून कमाईच्या २५ टक्के भाग मॉडेल्सना देण्यात आला  होता. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारी