बेंगळूरू : आयपीएलमध्ये पतीच्या सट्टेबाजीमुळे कर्जाचा डोंगर झाल्याने त्रासलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे घडली आहे. अभियंता दर्शन बाबू याची २३ वर्षीय पत्नी रंजिता हिचा मृतदेह १८ मार्च रोजी घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.
रंजिताचा पती दर्शन याने सट्टेबाजीसाठी १३ जणांकडून दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते त्याच्या घरी येऊन पैशाची मागणी करत होते. या त्रासाला कंटाळून रंजिताने आत्महत्या केली. रंजिताचे वडील व्यंकटेश यांनी सांगितले की, २०२० मध्ये रंजिताचे लग्न झाले. दर्शन हा अभियंता आहे.
दर्शनने आयपीएलवर सट्टा लावला. यासाठी त्याने दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली होते. दर्शनने एक कोटी रुपये दिले होते. मात्र अजून त्याला ८४ लाख रुपये द्यायचे होते.