बिलासपूर : नवऱ्याने पाय दाबून दिले नाही, म्हणून नाराज झालेल्या पत्नीने रात्रीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील बिलासपूर येथे घडली. दोघांचा ६ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. वर्षांच्या मुलासोबत झोपून गेला. पाय न दाबता झोपून गेल्यामुळे सुशीला नवऱ्यावर नाराज झाली आणि रात्री गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.
सुशीला साहू असे या महिलेचे नाव आहे. पती भूपेंद्र यांच्यासोबत ती देवरीडीह येथे राहत होती. प्राप्त माहितीनुसार, तिची तब्बेत ठीक नव्हती. पाय दाबून द्या, असे पतीला सांगून ती आपल्या खोलीत गेली. मात्र, पती भांडी घासणे व इतर कामांमध्ये गुंतला. त्यानंतर तो ३ वर्षांच्या मुलासोबत झोपून गेला. पाय न दाबता झोपून गेल्यामुळे सुशीला नवऱ्यावर नाराज झाली आणि रात्री गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. भूपेंद्र याला काही आवाजामुळे जाग आल्यानंतर तो सुशीलाच्या खोलीत गेला तेव्हा ती फासावर लटकलेली त्याला दिसली. त्याने तिला खाली उतरवून रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे