नवी दिल्ली - पती-पत्नीत किरोकोळ कारणांवरून नेहमीच वाद होत असतात. काही वेळा हे वाद टोकाला देखील जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. कारल्याच्या ज्यूससाठी एका पत्नीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडली आहे. आग्रा येथे ही अजब घटना घडली आहे. आपला नवरा कारल्याचा ज्यूस पित नाही, अशी तक्रार घेऊन बायको चक्क पोलिसांकडे गेली आहे. या घटनेने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला असून याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील कुटुंब सल्लागार केंद्रावर हे कपल गेलं. तिथं त्यांचं समुपदेशन करण्यात आलं. या दोघांच्या भांडण्याचं कारण चक्क कारल्याचा ज्यूस होता. पत्नीच्या तक्रारीनुसार तिच्या पतीला डायबेटिज आहे. ती त्याला कारल्याचा ज्यूस बनवून देते पण तो पित नाही. ती नेहमी त्याला कारल्याचा आणि दुधीचा ज्यूस देते. त्याच्या आरोग्याची काळजी घेते म्हणून तो दररोज भांडतो.
तब्बल दोन महिने या कपलतं काऊन्सिंग सुरू होतं. अखेर पतीने आपली चूक मान्य केली. आपण आता भांडण न करता कारल्याचा ज्यूस घेईन असं त्याने पोलिसांसमोर पत्नीला आश्वासन दिलं. त्यानंतर दोघंही एकत्र घरी गेले. याआधी देखील जेवणावरून अनेक पती पत्नीमध्ये खटके उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.