पानीपतमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जी अंगावर काटा आणू शकते. पानीपतच्या सनोलीमध्ये एका महिलेला तिच्या निर्दयी पतीने दीड वर्ष बाथरूममध्ये डांबून ठेवलं. पत्नीला तो मारत होता आणि काही खायलाही देत नव्हता. महिला संरक्षण अधिकाऱ्यांनी या महिलेची सुटका केली तेव्हा तिने सर्वातआधी जेवण मागितलं.
पानीपतच्या सनौलीतील रिशपूर गावातील एका महिलेसोबत इतकी वाईट वागणूक देण्यात आली की, तिला टॉयलेटमध्ये बंदी बनवून ठेवण्यात आलं. तिला दिवसातून एकदाच जेवणासाठी बाहेर काढलं जात होतं. जिल्हा महिला संरक्षण अधिकारी रजनी गुप्ता यांनी सनोली पोलीस स्टेशनच्या मदतीने या महिलेची सुटका केली. टॉयलेटच्या बाहेर येताच या महिलेने सर्वातआधी जेवण मागितलं. या महिलेची आंघोळ करून दिली तर तिने टिकली आणि लिपस्टीकही मागितलं. टॉयलेटच्या छोट्या जागेत तिला डांबल्याने या महिलेचे पायही सरळ होत नाहीयेत. आरोप आहे की, ३५ वर्षीय रामरतीला तिचा पती नरेशने साधारण दीड वर्षांपासून टॉयलेटमध्ये डांबून ठेवलं होतं.
रजनी गुप्ता यांनी सांगितले की, एका माहितीवर त्या मंगळवारी रिशपूर येथील नरेशच्या घरी पोहोचल्या. पोलिसही सोबत होते. नरेश घराबाहेर मित्रांसोबत जुगार खेळताना दिसला. त्याला रामरतीबाबत विचारले तर तो गप्प झाला. त्याला जर दम देऊन विचारले तर तो घराच्या पहिल्या माळ्यावर घेऊन गेला. त्याने टॉयलेटचा दरवाजा उघडला, ज्यात महिलेला डांबण्यात आलं होतं.
महिलेचे कपडे घाणेने माखले होते. शरीर हाडांचा सापळा झालं होतं. बाहेर येताच महिलेने जेवणाची मागणी केली. पोलिसांनी दबाव दिल्यावर नरेशने रामरतीची आंघोळ करून दिली. एका महिलेनेही त्याची मदत केली. कपडे बदलल्यावर महिलेला जेवण देण्यात आलं. तिची सुटका झाल्यावर महिला आनंद दिसली.
नरेशने सांगितले की, साधारण १० वर्षांआधी रामरतीचे वडील आणि भावाचा मृत्यू झाला. तेव्हापासून तिची मानसिक स्थिती ठिक नाही. कुठे जाऊ नये म्हणून आणि कुणाला नुकसान पोहोचवू नये म्हणून त्याने तिला टॉयलेटमध्ये बंद करत होता. उपचाराची कागदपत्रे मागितली तर ती त्याने तीन वर्षांआधीची दाखवली. म्हणजे सध्या तिच्यावर उपचार सुरू नव्हते.
पोलीस अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, नरेशला अटक करण्यात आली आहे. तर रामरतीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रजनी यांच्यानुसार रामरतीची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी तिला नाव विचारले तर तिने बरोबर सांगितलं. तिने हेही सांगितले की, तिचं माहेरच्या गावाचं नाव किवाना आहे. भाऊ आणि वडिलांचं निधन झालं आहे. घरी केवळ आई आहे. या महिलेने पतीसह तीन मुलांना आणि शेजाऱ्यांच्या मुलांनाही ओळखलं. रामरतीच्या तीन मुलांना विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितले की, आई आजारी राहते.