उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सफाई कर्मचारी आलोक मौर्य आणि त्याची पत्नी एसडीएम ज्योती मौर्य यांच्यातील वादाचे प्रकरण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या दोघांच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे. त्याचवेळी अशीच काही प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. महिलांच्या शिक्षणाबाबत गावात, शहरात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजपासून 50 किमी अंतरावर असलेल्या मेजा येथे अशीच घटना घडली आहे. येथे राहणारे रवींद्र कुमार हा खासगी काम करतो त्याची पत्नी रेश्मा ही यूपी पोलिसात कॉन्स्टेबल आहे.
रवींद्र कुमार सांगतो की, त्याने जमीन विकून पत्नीला शिकवलं. जेव्हा रेश्मा सरकारी नोकरीत म्हणजेच यूपी पोलिसात भरती झाली तेव्हा तिने आमच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. पत्नीच्या या वागण्याने रवींद्र खूप त्रस्त झाला. प्रयागराजमधील मेजा येथे राहणाऱ्या रवींद्र कुमारचं 2017 मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर एक वर्ष पती-पत्नीमध्ये खूप प्रेम होतं. रवींद्र राज्याबाहेर खासगी नोकरी करत होता, तर रवींद्रची पत्नी घरीच अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.
जेव्हा रेश्माची एक वर्षानंतर यूपी पोलिसात निवड झाली तेव्हा त्यांच्या नात्यात दुरावा आला. रवींद्रच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी रेश्माची यूपी पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली. रेश्माच्या अभ्यासाची प्रत्येक गरज पूर्ण केली. कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून त्याने आपली जमीनही विकली. मी मेहनत घेतली आणि फी भरत राहिलो. पत्नीची निवड होताच तिचा स्वभाव बदलू लागला. पत्नीची निवड झाल्यानंतर मी खूप सेवा करत राहिलो. पत्नीने आता रवींद्रवर अनेक आरोप केले.
हे आरोप चुकीचे असल्याचे सांगत रवींद्र म्हणाले की, मला न्याय हवा आहे. जर माझी बायको माझ्याकडे परत आली तर मी सर्वकाही विसरून तिला पुन्हा माझ्याजवळ ठेवेन. दुसरीकडे, रवींद्रची आई राजवंती देवी सांगतात की, तिला आमची सून म्हणून नाही तर आमची मुलगी म्हणून ठेवलं होतं. ती आमचा आधार बनेल असं वाटलं होतं पण आम्ही कल्पनाही करू शकत नाही की हे तिने केलं आहे. तर रेश्माने पतीने लावलेले सर्व आरोप निराधार आहेत. पतीने मला अनेकदा मारहाण केली, पण लोकांच्या भीतीने मी हे कोणालाही सांगितले नाही असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.