यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणं सोपं नाही. त्यासाठी दिवसरात्र काम करावं लागतं. जर विवाहित महिला यूपीएससीची तयारी करत असतील, तर त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत जी लग्नानंतर IAS ऑफिसर बनली. आयएएस होण्याचं श्रेय तिने आपल्या पतीला दिलं आहे. काजल जावला असं या महिलेचं नाव असून काजलने पूर्णवेळ नोकरीसह यूपीएससीची तयारी केली आणि पाचव्या प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी बनली.
पतीने साथ दिली नसती तर काजलचा हा प्रवास अजिबात सोपा नसता. काजलने एका मुलाखतीत सांगितले होते की, "लग्न झाल्यानंतर मुलीला समस्यांना सामोरे जावे लागते, हे आम्हाला समजते, पण आयुष्याचा जोडीदार चांगला असेल तर असे होत नाही. खूप साथ दिली. आज तुम्ही म्हणू शकता की त्याच्या पाठिंब्यामुळेच मी आयएएस अधिकारी झाले आहे. लग्नानंतर एका महिलेला घराची जबाबदारी कशी पेलायची हे टेन्शन असतं, पण माझ्या नवऱ्याने मला या सगळ्यात मदत केली."
"माझा बराच वेळ वाचला आणि मी माझ्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकले. मी जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा माझे पती घरातील सर्व कामे करायचे. मी जेव्हा ऑफिसमधून घरी यायचे तेव्हा ते त्यांच्या ऑफिसमधून थोडे आधी येऊन भाजी तयार करायचे. मी फक्त घरी जाऊन चपात्या बनवल्या आणि आम्ही दोघेही आरामात खायचो. माझ्या पतीने नोकरीबरोबरच घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या." काजल जावला ही हरियाणाची रहिवासी आहे. त्यांचे शालेय शिक्षण हरियाणातून झाले. शाळेनंतर तिने इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला.
इंजिनिअरिंग केल्यानंतर तिला विप्रोमध्ये नोकरी मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती विप्रोमध्ये वर्षाला 23 लाख कमावत होती. अनेकांसाठी हे स्वप्नवत काम असतं पण काजलला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं. पतीने काजलचे स्वप्न समजून घेतले आणि तिला पूर्ण पाठिंबा दिला. काजलने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि तिच्या पतीने तिला घर चालवण्यात मदत केली. 2019 मध्ये, काजलने तिच्या 5व्या प्रयत्नात 28 व्या क्रमांकाने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि ती IAS अधिकारी बनली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"