सागर – ३५ दिवसापूर्वी सागर जिल्ह्यातील एनएच २६ महामार्गावर रोड अपघातात कारमध्ये जिवंत जळाल्याने पतीचा मृत्यू झाला. या धक्क्यातून न सावरणाऱ्या पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणात सध्या पोलीस तपास सुरू आहे. माहितीनुसार, रिजवाना खान हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शाहगढ येथील तिच्या वडिलांच्या घरीच राहायला होती.
शुक्रवारी कुटुंबाने रिजवानाला उठवलं आणि तयार व्हायला सांगत तिच्या रुममधून बाहेर पडले. खूप वेळ झाला तरी रिजवाना बाहेर येत नाही त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती तिच्या रुममध्ये परत गेले. परंतु रुममध्ये जे दृश्य पाहिलं ते पाहून कुटुंबांला मोठा धक्का बसला. रिजवानाचा मृतदेह पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर तातडीनं कुटुंबाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
शाहगड पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन त्याचं पोस्टमोर्टम केले आणि पुन्हा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला. मृतक रिजवानाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली नाही. रिजवानाचे वडील लियाकत खां यांनी सांगितले की, रिजवानाचे लग्न जवळपास ६ वर्षापूर्वी साजिद खान या काजी टीकमगड येथे राहणाऱ्या युवकाशी झालं होतं. एक महिन्यापूर्वी साजिद आणि रिजवाना कारमधून घराच्या दिशेने येत होते. तेव्हा अचानक कारचा अपघात झाला. या अपघातात कारमध्ये आग लागली आणि जावई साजिद खानचा जळाल्यामुळे मृत्यू झाला.
तर रिजवाना गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवसांपूर्वीच रिजवाना बरी झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर तिला शाहगड येथील घरी आणलं. डोळ्यासमोर पतीचा जळून मृत्यू झाल्यानं तिला मोठा धक्का बसला होता. रिजवाना रोज तिच्या पतीचा फोटो पाहून दिवसभर रडत होती. तिला हे दु:ख सहन झालं नाही.
३५ दिवसापूर्वी झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू
३० एप्रिलला सागर जिल्ह्यातील साईखेडा ते लिधौरा या दरम्यान कारचं नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर चढली. हा अपघात इतका भीषण होता की, कारला आग लागली. या अपघातात साजिद खान यांचा जिवंत जळाल्याने मृत्यू झाला. तर पत्नी रिजवाना खान आगीच्या चपाट्यात सापडल्यानं गंभीररित्या जखमी झाली होती.