शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

हुश्श..अखेर ५ कोटी ७९ लाख प्राप्त मनपा: एलबीटी अनुदान पदरात

By admin | Published: August 25, 2015 12:38 AM

महसूल विभागाकडून शासन आदेशाप्रमाणे ५ कोटी ७९ लाखांचे अनुदान सोमवारी प्राप्त झाले.

जळगाव : एलबीटी वसुली बंद झाल्याने हक्काचे पैसा मिळणे बंद झाल्याने अडचणीत आलेल्या महापालिकेने महसूल विभागाकडून शासन आदेशाप्रमाणे ५ कोटी ७९ लाखांचे अनुदान सोमवारी प्राप्त झाले. एलबीटीच्या माध्यमातून महापालिकेस वर्षाकाठी ६५ कोटींची वसुली होत असे. मात्र १ ऑगस्टपासून शासनाने एलबीटी बंदचा निर्णय घेतल्याने महापालिचे हक्काचे उत्पन्न बंद झाले. अगोदरच आर्थिक अडचणीत असलेली महापालिका यामुळे अधिकच अडचणीत आली. अनेक महिन्यांपासून कर्मचार्‍यांचे पगारही थकले आहेत. पैसा नसल्याने शिक्षकांचे ५० टक्के वेतन देणे शक्य नसल्याने मोठे आंदोलनही झाले होते. त्यामुळे बंद झालेेल्या एलबीटीपोटी पोटी अनुदान मिळावे अशी मनपाकडून अपेक्षा केली जात होती. गेल्या आठवड्यात अनुदानाची प्रतीक्षा संपली. शासनाकडून महापालिकेस ५ कोटी ७९ लाखांचे अनुदान मंजूर झाले. हा निधी जिल्हा प्रशानाकडून प्राप्त झाला. मात्र जिल्हा प्रशासनाकडून करांच्या थकीत १२ कोटींच्या वसुलीपोटी ही रकम जमा करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. हा प्रकार शासनाच्या लक्षात आल्याने शासनानेदेखील अशा प्रकारच्या परस्पर वसुलीस नकार दिला. त्यामुळे ही रकम मनपाकडे सोमवारी वर्ग करण्यात आली. ही रकम मनपाच्या नव्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना असल्याने या अनुदानाचे स्वतंत्र खाते उघडण्याची प्रक्रिया सकाळी सुरू झाली. हा निधी आता महापालिका कोणत्या कारणासाठी वापरते यावर एक दोन दिवसात निर्णय अपेक्षित आहे.