एका नवीन आणि अनोख्या व्हायरसमुळे शास्त्रज्ञांचे टेन्शन वाढले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की त्यांनी यापूर्वी असा व्हायरस पाहिला नव्हता. हा बाकीच्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हा नवीन व्हायरस आर्कटिकपासून अटलांटिक महासागरापर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. या नवीन व्हायरस नाव Mirusvirus असे आहे. मायरस हा लॅटिन शब्द आहे, ज्याचा अर्थ विचित्र असा होतो. एका अहवालानुसार, समुद्रात असलेल्या प्लँकटॉन्सला मायरस व्हायरसने संसर्ग केला आहे. अशा परिस्थितीत धोका वाढला आहे. मायरस व्हायरस वेगाने पसरत आहे. नवीन व्हायरसमुळे काय नुकसान होऊ शकतं ते जाणून घेऊया...
Mirasvirus हा DuploDNAvaria चा एक भाग आहे. या गटातील हर्पिस व्हायरस देखील आहे जो मानव आणि प्राणी दोघांनाही संक्रमित करतो. हर्पिस व्हायरस आणि मायरस व्हायरस अनुवांशिकरित्या एकमेकांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय मायरस व्हायरसमध्ये जॉईंट व्हायरस वॅरिडीएनएवीरियाचे जेनेटिक कॅरेक्टर सापडले आहेत.
नेचर जर्नलमध्ये मायरस व्हायरसवर एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की VariDNAVaria आणि DuploDNAVaria मधील हायब्रिड व्हायरस Mirasvirus आहे. सीएनआरएसच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, मायरस व्हायरस हा वेगळ्या प्रकारचा व्हायरस आहे. असा व्हायरस यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.
अशा प्रकारे मायरस व्हायरसचा लागला शोध
या नवीन अनोख्या व्हायरसबद्दल शास्त्रज्ञ फारशी माहिती काढू शकलेले नाहीत, असेही सांगण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी व्हायरस शोधण्यासाठी मोहिमेचा डेटा वापरला. याशिवाय 2009 ते 2013 या कालावधीत अनेक समुद्राच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. संशोधकांनी अनेक सूक्ष्मजंतूंची डीएनए चाचणी केली.
मायरस व्हायरसमुळे काय होतं नुकसान?
हा क्रांतिकारी शोध असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मायरस व्हायरस हा डबल स्ट्रँडेड DNA व्हायरस आहे. हे समुद्राच्या प्रकाशमय भागात आढळतात. ते समुद्राच्या लाटांच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. त्यामुळे येणाऱ्या काळात समुद्रात असलेल्या कार्बन आणि पोषक घटकांना हानी पोहोचेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"