शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सरकारी नोकरी अन् 10 लाख रुपये द्या; हैदराबाद एन्काऊंटरमधल्या आरोपीच्या पत्नीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 4:58 PM

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली.

तेलंगणाः हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली. पोलिसांनी त्या नराधमांचं एन्काऊंटर केल्यानंतर बरेच वादविवाद रंगले होते. काहींनी आरोपींचं केलेलं एन्काऊंटर योग्य असल्याचं सांगितलं. तर काहींनी अशा घटनांमुळे न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल, अशीही मल्लिनाथी केली. त्यातच आता एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आलेल्या आरोपीच्या पत्नीनं सरकारी नोकरी आणि 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. तसेच त्या आरोपींचे मृतदेह कधी सोपवणार आहेत, यासंदर्भातही कुटुंबीयांनी विचारणा केली आहे.टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्येतला आरोपी  चिन्नाकेशवुलुच्या गर्भवती पत्नीनं सांगितलं की, मी आता माझ्या पतीला मागत नाही. आता त्याचा मृत्यू झालेला आहे. पण जर सरकारनं मला माझ्या गावात रोजगार उपलब्ध करून दिल्यास मी माझ्या आणि कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करू शकेन. तसेच आरोपींच्या आई-वडिलांनाही एकुलता एक मुलगा गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. आता सरकारनं त्यांना एक प्लॅट आणि 10 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावेत, अशी मागणी आरोपीच्या कुटुंबीयांनी केली आहे. आरोपींचे मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचंही कुटुंबीयांनी सांगितलं. तसेच आरोपींचे मृतदेह अद्यापही शवागारात ठेवण्यात आले असून, न्यायालयाच्या आदेशानंतरच ते कुटुंबीयांना सोपवण्यात येणार आहेत.हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी एन्काऊंटर  केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला. अधिक तपासासाठी आरोपींना घटनास्थळी  नेण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून या आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला.  

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरण