शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

Hyderabad Rape-Murder Case : विकृतीचा कळस! मृतदेह पूर्णपणे जळाल्याची खात्री करण्यासाठी 'ते' पुन्हा आले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 11:23 AM

पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

हैदराबाद - हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. सायबराबाद पोलिसांनी तपासानुसार मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिचा मृतदेह जाळून आरोपी पसार झाले होते. मात्र मृतदेह पूर्णपणे जळाला का हे पाहण्यासाठी ते घटनास्थळी परत आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 

आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने दारू पाजण्याचा देखील प्रयत्न केला. तसेच बलात्कारानंतर तिला जाळले आणि पसार झाले. मात्र मृतदेह पूर्णपणे जळाला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी ते घटनास्थळी पुन्हा एकदा आले होते. शिवा आणि नवीन या दोन आरोपींनी राष्ट्रीय महामार्ग 44 वर शमशाबाद आणि शादनगरच्या दरम्यान संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. नंतर चट्टनपल्ली गावामधील एका ठिकाणी त्यांनी मृतदेह जाळला. यानंतर ते तिथून पसार झाले. मात्र मृतदेह पूर्णपणे जळला की नाही याची हे पाहण्यासाठी, त्याची खात्री करून घेण्यासाठी काही वेळाने ते पुन्हा त्या ठिकाणी आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. 

बलात्कार आणि हत्या प्रकरणाची वेगाने चौकशी होण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जलदगती न्यायालय (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापन करण्याची व तिच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याची घोषणा केली. बलात्कार व हत्या प्रकरण हे फारच भयंकर असून, मला तीव्र वेदना झाल्याचे राव यांनी म्हटले. त्या घटनेनंतर राव प्रथमच जाहीरपणे बोलले असून अधिकाऱ्यांना त्यांनी जलदगती न्यायालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

पीडिता शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशू चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेला काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितेनं फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री 9.15 वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.

दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितेच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची 6 वाजता दूधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी आले असतं त्यांना पीडितेचा स्कार्फ आणि चप्पल दिसली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनDeathमृत्यूPoliceपोलिस