शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

PUBG चं वेड जिवाशी खेळ; एका विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 9:01 AM

जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. PUBG मुळे एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देPUBG मुळे एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.तेलंगणातील मलकानगिरी जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.पालकांच्या ओरडण्यामुळे नाराज झालेल्या मुलाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.

हैदराबाद - पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. PUBG मुळे एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील मलकानगिरी जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, परिक्षेच्या काळात हा विद्यार्थी सतत PUBG गेम खेळत होता. मुलाला असलेल्या पबजीच्या वेडामुळे आई-वडील हैराण झाले होते. त्यांनी अनेकदा मुलाला समजावले व दहावीचे वर्ष असल्यामुळे अभ्यास करण्याचा सल्ला दिला. मात्र तरीही मुलगा अभ्यास न करता दिवसभर पबजी खेळण्यात व्यस्त असल्याने ते त्याला ओरडले. पालकांच्या ओरडण्यामुळे नाराज झालेल्या मुलाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

'तो' सलग 45 दिवस PUBG खेळला, अन्...पबजी खेळण्याची सवय काही दिवसांपूर्वी एका तरुणाच्या जीवावर बेतली होती. सलग 45 दिवस पबजी खेळल्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. सतत पबजी खेळल्यामुळे मान सुजून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. तेलंगाणातील जगतियाल या शहरात सलग 45 दिवस पबजी खेळल्याने तरुणाचा मृत्यू झाला होता. सतत गेम खेळत असल्याने तरुणाला मान वळवताही येत नव्हती. मानेला सूज आल्यामुळे त्याच्या मानेत वेदना सुरू झाल्या होत्या. उपचारासाठी या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

PUBG गेम आता फक्त सहा तासच खेळता येणार?पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने आता या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात फक्त सहा तासच हा खेळ खेळता येणार आहे. गुजरातमधील सूरत आणि राजकोटमध्ये पबजी खेळण्यावर बंदी आहे. यासंबंधीचे परिपत्रक पोलिसांनी सोशल मीडियावरून जारी केले होते. तसेच सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना गुजरातमध्ये पोलिसांनी अटक केली होती. पबजी या खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

PUBG खेळणं पडलं महागात, 10 जणांना अटककाही दिवसांपूर्वी राजकोटमध्ये पबजी खेळणं काही लोकांना महागात पडलं होतं. गुजरात सरकारने परीक्षेच्या काळात पबजी खेळण्यावर बंदी घातली आहे. मोबाईलवर पबजी खेळून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना गुजरातमध्ये पोलिसांनीअटक केली होती. पबजीवर परिक्षेच्या काळात म्हणजेच 9 मार्चपासून बंदी घालण्यात आली असून 30 एप्रिलपर्यंत ही बंदी राहणार आहे. राजकोट पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांना अटक केली होती. 

'PUBG' च्या वेडापायी मुलाने वडिलांच्या अकाऊंटमधून 50,000 चोरले

पंजाबमधील एका मुलाने 'पबजी' च्या वेडापायी वडिलांच्या बँक अकाउंटमधून पेटीएमच्या साहाय्याने तब्बल 50,000 रुपये चोरल्याची घटना समोर आली होती. दोन दिवसांपूर्वी जालंधरमध्ये ही घटना घडली. पबजी खेळण्यासाठी त्यासंबंधीत काही सामान आणण्यासाठी पैसे चोरल्याची माहिती मिळली होती. मुलाच्या वडिलांनी बँक अकाउंटमधून 50,000 रुपये वजा झाल्यामुळे यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र नंतर आपल्याच मुलाने पैसे चोरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडिलांनी पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली. 

पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अ‍ॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी 1 ते 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.

 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमSuicideआत्महत्याTelanganaतेलंगणा