हैदराबाद : अमेरिकेतील जॉर्जियामध्ये एका भारतीय युवकाची चाकूने वार करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा युवक हैदराबादचा रहिवासी आहे. त्याच्या शरिरावर अनेक वेळा चाकूने वार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. घराबाहेरच त्याचा मृतदेह आढळून आला होता. आता पीडित कुटुंबाने अंत्यसंस्कारासाठी सरकारकडे मागणी केली आहे.
या युवकाच्या कुटुंबीयांनी अत्यंसंस्कारासाठी अमेरिकेत जाण्यास मदत करावी, अशी मागणी केली आहे. या मृत युवकाचे नाव मोहम्मद आरिफ मोहिउद्दीन, असल्याचे सांगण्यात येत आहे. तो गेल्या 10 वर्षांपासून जॉर्जियामध्ये किराना स्टोअर चालवत होता.
मोहम्मद आरिफची पत्नी मेहनाज फातिमाने म्हटले आहे, "मी सरकारकडे, माझी आणि माझ्या वडिलांची इमरजन्सी व्हिसावर अमेरिकेत जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. जेने करून आम्हाला तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करता येतील."
असेही म्हटले जाते, की संबंधित घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ग्रोसरी स्टोरमध्ये अनेक हल्लेखोरांसोबत एक कर्मचारीही दिसत आहे.
फातिमाने सांगितले, "रविवारी सकाळी साधारणपणे 9 वाजजाच्या सुमारास मी आरिफला फोन केले होता. यावेळी, अर्ध्या तासांनी पुन्हा फोन करतो, असे त्याने सांगितले होते. मात्र, त्याने मला कुठल्याही स्वरुपाचा फोन केला नाही. यानंतर, पतीच्या बहिणीकडून मला समजले, की काही अज्ञात लोकांनी चाकूने वार करून त्याची हत्या केली. आरिफचा मृतदेह सध्या जॉर्जियातील रुग्णालयात आहे. तेथे कुटुंबातील कुठलाही सदस्य उपस्थित नाही."
तेलंगानातील पक्ष मजलिस बचाओ तहरीकचे (MBT) प्रवक्त्ये उल्लाह खान यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासाला मृत आरिफच्या कुटुंबीयांच्यावतीने पत्र लिहिले आहे.