बडोदा : गुजरातच्या १८१ या अभय हेल्पलाईनवर कातरलेल्या आवाजात एक फोन येतो. समोरच्या बाजुला महिला असते, काहीशा क्षीण आवाजात तिने जे काही सांगितले ते ऐकून या सरकारी कार्यालयातील साऱ्यांना धक्का बसला. ८७ वर्षांच्या महिलेने तिच्या पतीच्या सेक्स लाईफविषयी माहिती दिली. त्याच्या या सवयीमुळे त्रस्त झाल्याचे तिने सांगितले. तसेच मदत करण्याची विनंती केली.
ही महिला गेल्या वर्षभरापासून अंथरुणाला खिळलेली आहे. यामुळे य़ा हायपरसेक्सुअल पतीपासून सुटका करावी अशी मागणी केली. हा वृद्ध आपल्या आजारी पत्नीकडे वारंवार शरीर संबंधाची मागणी करतो, आजारी असल्याने पतीची इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्याच्यापासून माझी सुटका करा, असे तिने या हेल्पलाईनवर सांगितले.
अभय हेल्पलाईनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जोडप्यामध्ये गेली अनेक वर्षे हेल्दी रिलेशनशिप राहिले आहे. मात्र, ही महिला एक वर्षापूर्वीच आजारी पडली. ती अंथरुणातून उठण्यासही सक्षम नाहीय. साधे एका अंगावरून दुसऱ्या अंगावर हलायचे झाले तरी तिला खूप कष्ट घ्यावे लागतात. मुलगा-सुनेच्या मदतीने ती चालते. पतीलाही तिच्या या परिस्थितीची कल्पना आहे. तरी देखील तो तिच्यावर शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असतो.
या महिलेचा पती हा निवृत्त इंजिनिअर आहे. पत्नीने नकार दिला की तो तिच्यावर आणि मुलावर ओरडतो. यामुळे शेजाऱ्यांनाही याची माहिती होते. यामुळे शेजारीही या प्रकारावर चर्चा होते. या साऱ्या त्रासाला पत्नी आणि तिचा मुलगा-सून त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच आम्हाला महिलेचा फोन आला. तिच्या घरी जाऊन आम्ही तिच्या पतीला भेटलो. त्याला त्याची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगितले आहे, तसेच पत्नी त्रस्त झाली आहे हे देखील सांगितले आहे. त्याचे काऊन्सिलिंग करून त्याला त्याचे मन इतर ठिकाणी वळविण्यास सांगितले आहे. योगा सेंटर, सीनिअर सिटीझन क्लब जॉईन करण्यास समजावले आहे. तसेच त्याला सेक्सॉलॉजिस्टकडे घेऊन जाण्यासही त्याच्या कुटुंबाला सांगितले आहे, असे हा अभय हेल्पलाईचा अधिकारी म्हणाला.