काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 05:40 AM2023-04-30T05:40:49+5:302023-04-30T05:41:10+5:30

काँग्रेसने मला ९१ वेळा अपमानित केले, काँग्रेसने अपशब्दांच्या शब्दकोशावर वेळ घालवण्यापेक्षा सुशासनावर लक्ष केंद्रित केले असते, तर त्यांची अशी दयनीय अवस्था झाली नसती अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली.

I accept the insults of the Congress as ornaments; Narendra Modi's attack Rahul Gandhi | काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

googlenewsNext

हुमनाबाद (कर्नाटक) : काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यांनी मला ९१ वेळा अपमानित केले आहे. काँग्रेसने इतकी मेहनत सुशासनासाठी घेतली असती, तर या पक्षाची अशी वाताहत झाली नसती, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांना ‘विषारी साप’ अशी उपमा दिली होती. त्याचा समाचार मोदींनी घेतला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथील जाहीर सभेत मोदी यांनी म्हटले की, काँग्रेसने माझ्याबद्दल वापरलेल्या अपशब्दांची यादी कोणी तरी मला पाठवली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ९१ वेळा माझ्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. काँग्रेसने अपशब्दांच्या शब्दकोशावर वेळ घालवण्यापेक्षा सुशासनावर लक्ष केंद्रित केले असते, तर त्यांची अशी दयनीय अवस्था झाली नसती.

मोदी यांनी सांगितले की, गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ‘चौकीदार चोर है’ अभियान चालविले होते. नंतर ते म्हणाले, ‘मोदी चोर है’ नंतर पुन्हा म्हणाले ‘ओबीसी समुदाय चोर है’. आता कर्नाटकात प्रचार सुरू होताच काँग्रेसने माझ्या लिंगायत बंधू-भगिनींना अपमानित केले आहे. मात्र, अपशब्दाला मतांच्या माध्यमातून उत्तर देण्याचा निर्णय कर्नाटकाच्या जनतेने घेतला आहे. मोदी यांनी म्हटले की, काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंबद्दलही अपशब्द वापरले होते. आपण आजही पाहतो आहोत की, काँग्रेस सावरकरांबद्दलही अपशब्द वापरत आहे. काँग्रेसच्या अपशब्दांचा मी आभूषण म्हणून स्वीकार करतो. 

निवृत्तीच्या नावाने मते मागण्याची वेळ
काँग्रेस नेत्यांवर आपल्या निवृत्तीच्या नावे मते मागण्याची वेळ आली आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लगावला आहे. मोदी यांनी सांगितले की, ‘ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला एक संधी द्या’, असे आवाहन काँग्रेस नेते करीत आहेत. मला माहिती आहे की, अशा थकलेल्या आणि पराभूत काँग्रेसला कर्नाटकचे लोक निवडणार नाहीत. उत्साही भाजपचीच ते निवड करतील.
 

Web Title: I accept the insults of the Congress as ornaments; Narendra Modi's attack Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.