शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

मी तर लोकसेवक, माझी पात्रता काय? काँग्रेसच्या टीकेला पंतप्रधान मोदी यांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 6:07 AM

‘काँग्रेसचे लोक म्हणतात की, ते मोदींना त्यांची जागा दाखवतील. अहो, तुम्ही राजघराण्यातील आहात, मी सामान्य कुटुंबातील आहे. माझी कोणतीही पात्रता नाही. माझी पात्रता मला दाखवू नका, मी जनतेचा सेवक आहे, नोकराची कोणतीही पात्रता नसते. कृपया विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा. गुजरात विकसित करण्यासाठी मैदानात या.’ 

सुरेंद्रनगर : ‘मी जनसेवक आहे, माझी पात्रता ती काय?’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत काँग्रेसवर टीका केली. तेलंगणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या शिव्याशाप हेच माझे पोषण आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता गुजरातमध्ये काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या पात्रतेसंदर्भातील वक्तव्याचा पंतप्रधानांनी समाचार घेतला. आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे मिस्त्री म्हणाले होते.सुरेंद्रनगर जिल्ह्यातील ध्रांगध्रा, भरूच जिल्ह्यातील जंबूसर आणि नवसारी शहरात सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्या सभा झाल्या. सुरेंद्रनगरमध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेसचे लोक म्हणतात की, ते मोदींना त्यांची जागा दाखवतील. अहो, तुम्ही राजघराण्यातील आहात, मी सामान्य कुटुंबातील आहे. माझी कोणतीही पात्रता नाही. माझी पात्रता मला दाखवू नका, मी जनतेचा सेवक आहे, नोकराची कोणतीही पात्रता नसते. कृपया विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा. गुजरात विकसित करण्यासाठी मैदानात या.’ 

गांधीनगर : प्रतिष्ठेचा लढागुजरात निवडणुकीत अमित शहा अधिकाधिक वेळ आपल्या गृहराज्यात व्यतित करू लागले आहेत.  गांधीनगर हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. तेथून पक्षाला अधिक यश मिळवून देण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे.

आदिवासींच्या अस्तित्वाकडे काँग्रेसचे दुर्लक्ष- प्रभू राम आणि भगवान कृष्णाच्या काळापासून आदिवासी देशात राहत असतानाही काँग्रेसच्या नेत्यांचे आदिवासींच्या अस्तित्वाकडे दर्लक्ष झाले, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील आदिवासीबहुल भरूच जिल्ह्यातील जंबूसर शहरात केली. - सार्वजनिक कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान केल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची थट्टा केली होती, असा दावाही त्यांनी केला. - “अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होईपर्यंत आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय का नव्हते? केंद्रात अटलजींच्या सरकारने वेगळे मंत्रालय बनवले व त्यांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली,” हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

‘भारत जोडो’वर टीकासत्तेबाहेर फेकलेल्यांना यात्रेच्या माध्यमातून परतायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नर्मदा प्रकल्प रोखणाऱ्यांबरोबर काँग्रेस नेते ‘भारत जोडो यात्रा’ काढत आहेत, अशी टीका केली. नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022congressकाँग्रेस