शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

'मीसुद्धा एक हिंदू मुलगी, हिंदुत्ववादाचा खेळ माझ्यासोबत खेळू नका'; ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 8:03 AM

नंदीग्राम येथे तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्रांचे पठण केले.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झालेली असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील निवडणूक रॅलीत भाजपावर निशाणा साधला. 

नंदीग्राम येथे तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्रांचे पठण केले. “मी दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंडीपाठाचे उच्चारण करते,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या, भाजपाने “हिंदुत्ववादाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये” असेही त्यांनी ठणकावले. तसेच मीसुद्धा एक हिंदू मुलगी आहे. माझ्याबरोबर हिंदुत्ववादाचा खेळू नका. मला सांगा, एक चांगला हिंदू कसे बनता येतं ते तुम्हाला माहित आहे का, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. 

तत्पूर्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणुक प्रचारादरम्यान दुखापतीचा सामना करावा लागला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आपल्या कारबाहेर कार्यकर्त्यांशी बोलून कारमध्ये शिरण्याच्या बेतात असताना काही समाजकंटकांनी कारचा दरवाजा  त्यांच्या दिशेने ढकलल्याने पायाला जखम झाली. 

नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्या एका मंदिरात गेल्या होत्या. तेथून बाहेर आल्यावर त्या कारपाशी उभ्या राहून कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यानंतर त्या कारमध्ये शिरत असताना दरवाजा आतील  बाजूस ढकलण्यात आला, त्यामुळे त्यांच्या पायाला जखम झाली. त्यांच्या पायाला सूज आली असून, अंगातही कणकण आहे. या प्रकारानंतर त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले. 

भाजपावर संशय

तुम्ही आम्हाला परक्या आहात, अशी पोस्टर्स नंदीग्राममध्ये भाजपने लावली आहेत. त्यामुळे तेथील तृणमूलचे कार्यकर्ते संतापले आहेत. अशातच हा प्रकार घडल्याने यामागे भाजपचे लोक असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालHinduहिंदूBJPभाजपाElectionनिवडणूक