शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'निराश अन् भयभीत झाले...', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:51 IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांवरील गुन्ह्यांबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

Kolkata Rape-Murder Case : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पश्चिम बंगालसह देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, बंगालमध्ये भाजपने सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. दरम्यान, आता देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीदेखील या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "ही घटना अतिशय वेदनादायक आणि भयावह आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पीटीआयशी बोलताना द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "बसं आता खूप झालं...कोणताही सुसंस्कृत समाज महिलांवर असे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला 'प्रामाणिक, निःपक्षपाती आत्मनिरीक्षणाची' आणि स्वतःला काही कठोर प्रश्न विचारण्याची गरज आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. निर्भयाच्या घटनेनंतर आपल्याला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसते." 

राष्ट्रपती पुढे म्हणतात, "त्या प्रकरणानंतर 12 वर्षात असंख्य बलात्कार झाले, ज्यांना समाज विसरला आहे. आता भारताला इतिहासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या संकटाचा आपण सर्वसमावेशकपणे सामना केला पाहिजे. कोलकातामध्ये विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत असतानाही गुन्हेगार कुठेतरी लपून बसले आहेत," अशी प्रतिक्रिया मुर्मू यांनी दिली.

काय आहे कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण?कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या अंगावर कपडे नव्हते, शरीरावर जखमा होत्या, रक्तस्त्राव होत होता. तिच्यावर बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांमध्ये असंतोष वाढला आणि ते संपावर गेले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे. या प्रकरणाला वेग आला तेव्हा उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत सीबीआयला आतापर्यंतच्या तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूwest bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाtmcठाणे महापालिका