प्रश्न- मी वर्क व्हिसावर अमेरिकेत जात आहे, अमेरिकेत मला कोणत्या प्रकारचे अधिकार मिळतील?
उत्तर - मुंबई जर तुम्हाला अमेरिकेचा वर्क व्हिसा, एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा, डोमेस्टिक एम्प्लॉई व्हिसा मिळाल्यास तुम्हाला वाणिज्यदूतावासाकडून अमेरिकेतील तुमच्या अधिकारांबद्दल माहिती देणारे पत्रक मिळेल. या पत्रकामध्ये वर्क व्हिसा घेणारे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे अमेरिकेतील कायदेशीर अधिकार समजून घेता येतील. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या व्हिसाअंतर्गत मिळणाऱ्या अधिकारांची माहिती मिळेल.
तुम्हाला कामाच्या जागी कोणताही भेदभाव न होता तसेच त्रासविना काम करण्याचा, जे काम तुम्ही करता त्याचा योग्य मोबदला मिळवण्याचा, तुमचा पासपोर्ट, व्हिसा व इतर ओळखपत्रे बाळगण्याचा, संघटना, आप्रवासी आणि कामगार संघटनांकडे मदत घेण्याचा, कामाच्या ठिकाणी सुरक्षीत राहाण्याचा, इतर कोणतेही संरक्षण मिळवण्याचा अधिकार तुम्हाला मिळत असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या अधिकारांवर ठाम राहिल्याबद्दल तुम्हाला काम देणारी व्यक्ती त्रास देऊ शकत नाही. अमेरिकेत तुमचा मुक्काम अत्यंत लाभदायी होईल याची आम्हाला खात्री आहे. जर काम देणारी व्यक्ती तुम्हाला अयोग्य पद्धतीने वागवत असेल तर तुम्ही नॅशनल ह्युमन ट्रॅफिकिंग हॉटलाइन 1-888-373-7888 वर संपर्क करु शकता. तुमचा व्हिसा किंवा तुमचा इमिग्रेशन दर्जा कोणताही असो जर तुम्हाला धोकादाक स्थितीची जाणिव झाली तर तुम्ही पोलिसांना 911 या क्रमांकावर संपर्क करू शकता. या पत्रकाचे नाव नो यूअर राइट्स असे आहे. ते इंग्लिश, हिंदी, उर्दू, पंजाबी, तमिळ आणि बंगाली अशा भाषांमध्ये travel.state.gov. वर उपलब्ध आहे.