शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मै इंदिराजीकी बहू हूं... किसीसे डरनेवाली नही!

By admin | Published: December 09, 2015 1:35 AM

नॅशनल हेराल्ड अफरातफर आणि लबाडीचे प्रकरण कायदेशीर मार्गाने न्यायालयात लढण्याऐवजी सरकारवर राजकीय हल्लाबोल करण्याचा पवित्रा काँग्रेस पक्षाने मंगळवारी घेतला.

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड अफरातफर आणि लबाडीचे प्रकरण कायदेशीर मार्गाने न्यायालयात लढण्याऐवजी सरकारवर राजकीय हल्लाबोल करण्याचा पवित्रा काँग्रेस पक्षाने मंगळवारी घेतला. परिणामी, न्यायालयाने काढलेल्या समन्सनुसार येथील महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे आरोपी म्हणून हजर न राहता, ही सरकारने राजकीय सूडभावनेने सुरू केलेली कारवाई असल्याचे आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यायालयाबाहेर केले. हेच सूत्र पकडून काँग्रेस सदस्यांनी आरडाओरड आणि गोंधळ करून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करणे भाग पाडले. भाजपा आणि सरकारने या आरोपांचा इन्कार केला व काँग्रेस नेत्यांनी राजकीय भांडवल करण्याऐवजी न्यायालयापुढे जाऊन आपले निर्दोषित्व सिद्ध करावे, असा प्रतिहल्ला केला.दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी समन्सविरुद्धची अपिले फेटाळल्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा केली होती. प्रत्यक्षात असे केले गेले नाही. त्यामुळे सोनिया व राहुल गांधी यांना महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर होणे भाग होते. परंतु सोनिया गांधी लोकसभेत जाऊन बसल्या होत्या व राहुल गांधी सकाळीच पूरग्रस्त पुद्दुचेरीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले होते.न्यायालयात काँग्रेसचे प्रवक्ते व ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सोनिया व राहुल गांधींसह इतरही पाच आरोपींना जातीने हजर न राहण्याची आजच्या (मंगळवार) एक दिवसासाठी सूट द्यावी, असा अर्ज केला. तो दंडाधिकाऱ्यांनी मंजूर केला. फक्त आजच्या दिवसासाठी सूट दिली आहे. पुढच्या तारखेला, १९ डिसेंबर रोजी सर्व आरोपींनी न चुकता दु. ३ वाजता हजर रहावे, असे निर्देश दंडाधिकाऱ्यांनी दिले. संसदेत ही बातमी येताच पत्रकारांनी सोनियांना विचारले, निकालाबाबत तुम्ही निराश आहात काय? त्यावर त्वेषाने उसळून सोनिया म्हणाल्या, मी जराही विचलित झालेली नाही’गेल्या १८ महिन्यांत सूडाच्या राजकारणाला धार चढली आहे. भाजपा देशाला काँग्रेसमुक्त करू पाहात आहे. पण लोकच पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा काँग्रेसला धुमधडाक्यात सत्तेवर आणतील, असा विश्वास पक्षप्रवक्त्यांनी व्यक्त केला.सूरजेवाला म्हणाले की, पूर्वीही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी या काँग्रेसच्या नेत्यांनी असे व्यक्तिगत हल्ले सोसले आहेत. आताही तेच सुरु आहे.————————या प्रकरणाचा सरकारशी काहीही संबंध नाही, असे ठामपणे सांगत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसच्या राजकीय सूडाच्या आरोपाचा इन्कार केला.> तामिळनाडूत कुड्डालोर येथे पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या आईहून अधिक थेट आरोप केला. प्रकरण कोर्टात आहे. संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे जे काही बोलायचे ते मी दिल्लीला गेल्यावरच बोलेन, असे सांगून राहुल यांनी सुरुवातीस प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पत्रकारांनी खूपच तगादा लावल्यावर ते म्हणाले, ‘मला यात सुडाचे राजकारण दिसते. असे करून मला गप्प करता येईल असा त्यांचा (सरकारचा) समज आहे. पण तसे बिलकूल होणार नाही. पूर्वीप्रमाणेच मी सरकारला जाब विचारतच राहीन.’> ‘‘मी जराही विचलित झालेली नाही’’संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सोनिया गांधी यांनी काँग्रेस समन्वय समितीची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार त्यांना भेटले. मात्र न्यायालयात जाण्याऐवजी तुम्ही इथे कशा? असे पत्रकारांनी त्यांना विचारले नाही; व सोनिया गांधींनीही न्यायालयात न जाण्याचे कारण स्वत:हून सांगितले नाही. त्याऐवजी त्यांनी, ‘मी कशाला निराश होऊ ? मी इंदिराजींची सून आहे. कोणाला घाबरणारी नाही,’ असे ठामपणे सांगितले. सोनियांनी या प्रकरणाला ‘राजकीय सूड’ असे म्हटले नाही. मात्र माध्यमे यातून काय तो अर्थ काढतील, असे त्या म्हणाल्या.