ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 29 - मी भाजपाची आयटम गर्ल आहे, ते इतर कोणाबद्दल बोलत नाहीत. त्यांनी सर्व लक्ष माझ्यावर केंद्रीत करुनच उत्तरप्रदेशात निवडणूक लढवल्या असे विधान समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी केले आहे. आझम खान यांचा भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधाने केल्याचा एक व्हिडीओ समोर आल्याने त्यांच्यावर चौफर टीका सुरु आहे.
"महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे"" अशी गंभीर विधाने त्यांनी केली आहेत.
या वक्तव्यांबद्दल स्पष्टीकरण देताना आझम खान म्हणाले की, मीडियाने माझ्या विधानांचा विपर्यास करुन चुकीचा अर्थ लावला. माझ्यामुळे लष्कराच्या मनोधैर्य कसे खचू शकते?पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात गेले तेव्हा लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम झाला असे आझम खान बरळले आहेत.
दरम्यान समाजवादी पार्टीने मात्र आझम खान यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे. ""नाजूक परिस्थिती असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असून आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो"", असं समाजवादी पक्षाच्या दिपक मिश्रा यांनी सांगितलं आहे. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणा-या राजकारण्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं आहे. तर भाजपाचे अजून एक प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी आझम खान फुटीरवादी आणि दहशतवाद्यांसाठी बोलत असल्याचं म्हटलं आहे. नरसिम्हा यांनी सांगितल्यानुसार, अशा प्रकारची वक्तव्यं करण्यासाठी समाजवादी पक्षच आपल्या नेत्यांना उकसवत असतो.
आझम खान यांनी अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ताज्या घटनेबद्दल बोलायचं झाल्यास बुलंदशहर सामूहिक बलात्कारावर त्यांनी केलेलं वक्तव्य. या सामूहिक बलात्काराला त्यांनी एक राजकीय षडयंत्र म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा त्यांच्या या वक्तव्याचं उत्तर मागितलं, तेव्हा मात्र आपल्या वक्तव्याच्या विपर्यास केल्याची पळवाट त्यांनी काढली. नंतर त्यांनी विनाअट माफीदेखील मागितली. न्यायालयाने त्यांचा हा माफीनामा स्विकार केला होता.
I am BJP"s item girl, they don"t have anyone else to talk about. They even fought elections here focusing on me: Azam Khan,SP pic.twitter.com/20PFUfJFXC— ANI UP (@ANINewsUP) June 29, 2017