ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - मागच्या सात वर्षात कॅम्पसमध्ये वावरत असताना कधीही मला मी मुस्लिम असल्याचे जाणवले नाही. मात्र मागच्या दहा दिवसात मला मी मुस्लिम असल्याचे वाटू लागले आहे. मी मुस्लिम आहे पण दहशतवादी नाही असे जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप असलेला उमर खालिद म्हणाला.
मागच्या काही दिवसांपासून फरार असलेला उमर खालिद आणि अन्य पाच आरोपी रविवारी रात्री जेएनयूमध्ये दाखल झाले. यावेळी विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना उमर खालिदने आपण देशविरोधी नसल्याचा दावा केला.
देशविरोधी घोषणाबाजीनंतर सरकारने कारवाई सुरु केल्यानंतर उमर खालिद फरार झाला होता. मिडीया ट्रायलच्या माध्यमातून मला दहशतवादी ठरवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्याचाही खालिदने निषेध केला.
९ फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमामुळे विद्यापीठावर कारवाई झाली नाही तर, सरकारला कारवाई करण्यासाठी कारण हवे होते असे उमर खालिद विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना म्हणाला. गल्फ आणि काश्मिरमध्ये ८०० फोन केल्याचा आरोपही खालिदने फेटाळून लावला.
उमर खालिद जेएनयूमध्ये असला तरी रात्री विद्यार्थ्यांनी केलेल्या विरोधामुळे पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. सोमवारी सकाळी दिल्ली पोलिस कारवाईची पुढची पावले उचलतील.
#Visuals Delhi: Student Umar Khalid who raised anti national slogans, in JNU Campus pic.twitter.com/H6DP4eO6Dj— ANI (@ANI_news) February 22, 2016