Congress Shashi Tharoor : “मला अदानी अंबानींशी ॲलर्जी नाही, जे माझ्या देशात…” पाहा काय म्हणाले शशी थरूर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 08:27 AM2022-10-10T08:27:47+5:302022-10-10T08:28:26+5:30

अदानी समूहाने राजस्थानमध्ये निरनिराळ्या क्षेत्रात ६५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.

I am not allergic to Adani Ambani or anyone else who investing for country and jobs for indians commented on congress presidential election | Congress Shashi Tharoor : “मला अदानी अंबानींशी ॲलर्जी नाही, जे माझ्या देशात…” पाहा काय म्हणाले शशी थरूर?

Congress Shashi Tharoor : “मला अदानी अंबानींशी ॲलर्जी नाही, जे माझ्या देशात…” पाहा काय म्हणाले शशी थरूर?

googlenewsNext

उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या राजस्थानमध्ये (Rajasthan) पुढील पाच वर्षांत ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी त्यांचे पक्षातील सहकारी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचा पुनरुच्चार केला आहे. गेहलोत यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचे इन्व्हेस्ट राजस्थान समिटमध्ये स्वागत केले होते. जिथे अदानी यांनी त्यांच्या समूहाच्या वतीने राज्यासाठी विविध घोषणाही केल्या होत्या.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी मुंबईत एनडीटीव्हीच्या विशेष टाऊनहॉलमध्ये थरूर यांना प्रेक्षकांनी भारताच्या आर्थिक विकासावर प्रश्न विचारला. यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याद्वारे मोठ्या व्यावसायिकांना कथितरित्या मदत करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात येत असलेल्या टीकेचा उल्लेख करण्यात आला. “मला अदानी, अंबानी किंवा आणखी कोणाशीही ॲलर्जी नाही, जे माझ्या देशात गुंतवणूकीद्वारे भारतीयांना रोजगार मिळवून देण्यात माझ्या देशातील लोकांच्या हिताची सेवा करण्यास तयार आहेत,” असं थरूर म्हणाले.

"खरी काँग्रेस म्हणते आणि गेहलोत म्हणाले होते की, जर कोणी माझ्या राज्यात येऊन गुंतवणूक करण्यास, नोकऱ्या निर्माण करण्यास, महसूल मिळवून देण्यास तयार असेल तर मला ते हवे आहे. अदानी यांनी तिरुअनंतपुरम विमानतळासाठी बोली लावली तेव्हाही माझे हेच विचार होते. त्यांनी निष्पक्ष विजय मिळवला आणि आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. माझ्याच मतदारसंघात हेच घडलं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य
थरूर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्य निवडणुकीबाबत मोठं वक्तव्यही केलं. मी या निवडणुकीत उमेदवार आहे, पण मी अशा काही गोष्टी ऐकल्या की, ही निवडणूक खरोखरच निष्पक्ष होणार आहे का, असा विचार करायला भाग पडतंय, असं थरूर म्हणाले. या निवडणुकीत खर्गे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे, असं मला पक्षाच्या काही नेत्यांनी सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं. मात्र, त्यांनी यासाठी गांधी कुटुंबावर आणि विशेषत: सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर कोणतेही आरोप करण्यावर स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

“गांधी कुटुंबीयांनी या निवडणुकीबाबत आधीच स्पष्ट केले आहे की ते अधिकृतपणे आपल्याकडून कोणालाही या पदासाठी उमेदवार बनवत नाहीत. या निवडणुकीत गांधी कुटुंबीय पूर्णपणे निष्पक्ष आहे आणि या निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनीही या निवडणुकीत कोणीही कोणाच्या बाजूनं नसल्याचं स्पष्ट केलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

Web Title: I am not allergic to Adani Ambani or anyone else who investing for country and jobs for indians commented on congress presidential election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.