"रडत राहणं काहींचा स्वभाव, माझा न रडण्यावर, ना रडवण्यावर विश्वास"; मोदींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 05:29 PM2021-05-24T17:29:53+5:302021-05-24T17:34:37+5:30
Viral Video : गुजरातमधील सूरत या ठिकाणी पंतप्रधान मोदी भाषण करतानाचा हा व्हिडीओ आहे. २०१९ मधील भाषणाचा हा व्हि़डीओ झाला व्हायरल. काही दिवसांपूर्वी एका बैठकीदरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले होते भावूक.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या काही राज्यांतील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यासोबतच, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्संसोबतही चर्चा केली. त्यांनी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. त्यावेळी, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला होता. दरम्यान, यानंतर आता मोदींच्या भाषणाचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यानं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींच्या गुजरातमधील एका भाषणाचा काही भाग शेअर केला आहे.
गुजरातमधील सूरत या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या २०१९ मध्ये झालेल्या भाषणाचा काही भाग व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "रडत राहणं काहींचा स्वभाव असतो. माझा न रडण्यावर विश्वास आहे, ना रडवण्यावर विश्वास," असं म्हणताना दिसत आहेत.
कुछ लोगों का स्वभाव होता है रोते रहना, न मेरा रोने में विश्वास है न रुलाने में - नरेंद्र मोदी
— Arun Yadav 🇮🇳 (@MPArunYadav) May 22, 2021
कल फिर घड़ियाली आंसू क्यों बहाए ?
देश की जनता जानना चाहती है ।#ModiStopCrying_RepealLaws#CrocodileTears#CrocodileTearsModi@INCIndia@INCMP@RahulGandhi@OfficeOfKNath@digvijaya_28pic.twitter.com/xzelj8BXmS
काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरूण यादव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. "रडत राहणं काहींचा स्वभाव असतो. माझा न रडण्यावर विश्वास आहे, ना रडवण्यावर विश्वास आहे असं नरेंद्र मोदी म्हणत आहेत. मग त्यांनी मगरीचे अश्रू का काढले. देशाच्या जनतेला याचं उत्तर हवं आहे," असं ते म्हणाले. यापूर्वी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीदेखील मोदींवर यावरून टीका केली होती. तसंच तो ठरवून करण्यात आलेला कार्यक्रम असल्याचा आरोपही केला होता.
चर्चेदरम्यान काय म्हणाले होते मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधील डॉक्टरांशी बोलताना प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. तसेच, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं. मात्र, कोविडच्या लढाईत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचा उल्लेख करताना मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय. कोरोनाच्या लढाईत आपण अनेक आप्तेष्ठांना गमावलंय. मी काशीचा एक सेवक असून काशीतील प्रत्येकाचे आभार मानतो. विशेषत: डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य सेवकांनी जे काम केलंय, ते कौतुकास्पद आहे. या महामारीने आपल्या जवळील माणसं नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असंही मोदी म्हणाले होते.