मुजफ्फरनगर/ गोपालगंज : बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना जोरदार लक्ष्य केले. नितीशजी मला ‘बाहरी’ म्हणतात. पण मी ‘बाहरी’ असेल तर सोनिया गांधी कोण? असा खोचक सवाल मोदींनी केला. गोपालगंज आणि मुजफ्फरपूर येथे मोदींनी निवडणूक सभांना संबोधित केले. या दोन्ही सभांमध्ये त्यांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर सडकून टीका केली. नितीश बाबू म्हणतात की, मी ‘बाहरी’आहे. मी ‘बाहरी’ कसा, हे मी त्यांना विचारू इच्छितो. बिहार हे भारताचे अभिन्न अंग आहे. बिहारच्या जनतेने मला पंतप्रधान म्हणून निवडून दिले आहे. मी पाकिस्तान, बांगलादेश वा श्रीलंकेचा पंतप्रधान आहे का? मी ‘बाहरी’ असेल तर सोनिया गांधी दिल्लीत राहतात. त्यांना नितीशकुमार ‘बाहरी’ म्हणणार की ‘बिहारी?’ बिहारच्या जनतेचे माझ्यावर प्रेम आहे आणि हे प्रेम वाढत आहे. ते पचनी पडत नसल्यानेच विरोधक माझ्यावर टीका करीत आहेत; पण कितीही चिखलफेक करा, बिहारात कमळच फुलणार. देशभरातील मांत्रिकांना बोलावले तरी तुमचा विजय अशक्य आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.गोपालगंज येथील सभेत मोदींनी लालूप्रसाद यादव यांना लक्ष्य केले. (वृत्तसंस्था)
मी बाहेरचा, मग सोनिया गांधी कुठल्या -मोदी
By admin | Published: October 30, 2015 10:08 PM