डेहराडून : केवळ फिती कापून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटने करण्यासाठी मी पंतप्रधान झालेलो नाही. लोकांनी मला पंतप्रधान म्हणून निवडून दिले, पण मी जनतेचा रखवालदारही आहे. हे काम मी प्रामाणिकपणे सुरू केल्यावर अनेकांचे धाबे दणाणले आहेत, असे कणखरपणे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडून येथील कार्यक्रमात नोटाबंदीचे जोरदार समर्थन केले व त्याला विरोध करणाऱ्यांवर प्रहार केले.काळा पैैसा, अतिरेक्यांना मिळणारा पैसा आणि मानवी व ड्रग्जची तस्करी यांच्यावर या माध्यमातून निर्णायक घाव घालण्यात आला आहे आणि याला जनतेचे भरपूर समर्थन आहे, असा दावा मोदी यांनी केला. ते म्हणाले की, काही लोक निराश आहेत. कारण, नोटाबंदीच्या निर्णयामुळे ‘चोरांच्या म्होरक्यावर’च हल्ला झाला आहे. काही लोकांच्या रक्तातच भ्रष्टाचार आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी त्यांनी मागच्या दरवाजाचा वापर केला आणि हा विचार केला की, मोदींना हे दिसणार नाही. पण, आम्हाला सर्वकाही ठाऊक आहे. नोटाबंदी हे स्वच्छता अभियान आहे, असे सांगून आपल्याला साथ देणाऱ्या लोकांचे त्यांनी आभार व्यक्त केले. (वृत्तसंस्था)कपाटे आणि गादीखालील काळा पैसा आता बँकांत येत आहे. देशाला देशोधडीस लावणारा काळा पैसा आणि काळी मने यांच्यापासून सुटका करण्यासाठी मी रखवालदार झालो आहे. - नरेंद्र मोदी
मी तर जनतेचा रखवालदार - मोदी
By admin | Published: December 28, 2016 4:56 AM