ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - शहीद जवानांचा अपमान करणारे अभिनेते ओम पुरी यांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव झाली आहे. 'शहिदांसंदर्भात मी जे काही वक्तव्य केले आहे, त्याबद्दल मला लाज वाटते. केलेल्या चुकीसाठी मी शिक्षेस पात्र आहे', असे ओम पुरी यांनी मान्य केले आहे. तसेच उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची, लष्कराची आणि देशाची देखील माफी मागितली आहे. 'आधी चूक करायची आणि मग माफी मागायची, ही बाब अजिबात समर्थनीय नाही', असे म्हणत त्यांनी स्वतःच निर्माण केलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
आणखी बातम्या
उरी दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले असताना त्यावर संताप व्यक्त करण्याऐवजी त्यांना सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का ? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितलं ? असे वादग्रस्त विधान ओम पुरी यांनी केले होते. या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणी आले आहेत. शहिदांचा अपमान केल्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.