शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

तेली बांधवांमुळेच मी मुख्यमंत्री झालो- देवेंद्र फडणवीस; समाजाच्या मागण्यांसाठी काम करण्याची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 11:33 PM

तेली समाजाने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान दिला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा मिळावा यासाठी मोदींनी संसदेत विधेयक सादर केले. मात्र, राज्यसभेत विरोधकांनी अडथळे आणल्याने ते संमत झाले नाही.

- सुमेध बनसोडनवी दिल्ली : तेली समाजाने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान दिला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा मिळावा यासाठी मोदींनी संसदेत विधेयक सादर केले. मात्र, राज्यसभेत विरोधकांनी अडथळे आणल्याने ते संमत झाले नाही. तेली समाजाच्या मागण्यांसाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची माझी तयारी आहे. तेली समाजाचा आशीर्वाद मला नेहमी असल्यामुळेच मी मुख्यमंत्री बनलो, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अ. भा. तेली शाहू महासभेतर्फे आयोजित ‘तेली एकता रॅली’तील हजारो समाजबांधवांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पहिल्यांदाच तेली एकता रॅली झाली. देशातून सुमारे ८ हजारांवर तेली बांधव एकत्रित झाले होते. महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबीर दास, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपेंद्र कुशवाह, खा. रामदास तडस, ताम्रध्वज शाहू, दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम, बिहारचे मंत्री रामनारायण मंडल, आमदार कृष्णा खोपडे तसेच अन्य नेते उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, मोदी यांच्यामध्ये सर्व समाजाला घेऊ न पुढे जाण्याची क्षमता आहे. महाराष्ट्राने पहिल्यांदा ओबीसी मंत्रालय स्थापन करून त्यासाठी ३ हजार कोटींची तरतूद केली. ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात सवलती दिल्या. अनुसूचित जाती, जमातींप्रमाणे ओबीसींतील गरिबांना २०१९पर्यंत महाराष्ट्र सरकार घरे देणारआहे.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी,‘जम गई है सारी देश की रॅली,क्यों की दिल्ली मेंहो रहीं है तेली एकता रॅली,देश के प्रधानमंत्री भी है तेली,अब तो बजाओ जोरदार ताली’असे म्हणून त्यांचा पक्ष समाजासोबत असल्याचे सांगितले. आपले मंत्रालय ओबीसींचे वर्गीकरण करण्याच्या विचारात असल्याचेही आठवलेंनी स्पष्ट केले.गंगु तेली आज राजा बन सकता है : जयदत्त क्षीरसागर‘क हाँ राजा भोज, कहाँ गंगु तेली’ असे म्हणून आपल्याला कमी लेखले जाते. पण आता गंगु तेली राजा बनू शकतो. ‘जिसके साथ है तेली, वो है भाग्यशाली’ असे म्हणत सर्व राजकीय पक्षांत समाजातील नेत्यांना योग्य नेतृत्व मिळाले पाहिजे, असे क्षीरसागर यांनी ठणकावून सांगितले. ओबीसींची लोेकसंख्या सुमारे ५१ टक्के असून, त्यांना आरक्षण २७ टक्केच मिळते. त्यामुळे २०११च्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करावी आणि ओबीसी आरक्षणाचे वर्गीकरण करावे, असे सांगून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी करताना जयदत्त क्षीरसागर यांनी ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ अशी घोषणा दिली.कमलनाथ यांचाराजकीय टोला!पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी खोटे बोलतात, अशी टीका काँग्रेस नेहमी करते. काँग्रेसचे महासचिव कमलनाथ यांनीही सरकारवर अप्रत्यक्षपणे तशीच टीका केली. तेली समाजाला न्याय मिळावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.मुख्य मागण्या- केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून त्याचा स्वतंत्र अर्थसंकल्प असावा.- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा.- दिल्लीत तेली समाज भवनासाठी सरकारने जमीन द्यावी.- तेली समाजाची आराध्य देवी ‘माँ कर्मा’ यांच्या नावे टपाल तिकीट काढावे.- राजकीय पक्षांनी योग्य समाजाला योग्य प्रतिनिधित्व देऊ न त्यांना खासदार, आमदार होण्याची संधी द्यावी.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNew Delhiनवी दिल्ली