Rivaba Jadeja : सुनेविरोधात सासरे! रवींद्र जडेजाची पत्नी भाजपाची उमेदवार, वडिलांकडून काँग्रेसचा प्रचार, रिवाबा म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 12:41 PM2022-12-01T12:41:15+5:302022-12-01T12:46:24+5:30
BJP Rivaba Jadeja : रवींद्र जडेजाच्या पत्नीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा यांनी वहिनी रिवाबाविरोधात आधीच प्रचार सुरू केलाय. मात्र, आता सासरेही सुनेच्या विरोधात आलेत.
गुजरात विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जामनगर उत्तरमध्ये रिवाबा जडेजा (BJP Rivaba Jadeja) म्हणजेच क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा यांनी वहिनी रिवाबाविरोधात आधीच प्रचार सुरू केलाय. मात्र, आता सासरेही सुनेच्या विरोधात आलेत. सुनेला नव्हे, तर काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी जनतेला केले. यावर आता रिवाबा जडेजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"माझे सासरे आणि नणंद त्या पक्षाचे सदस्य म्हणून प्रचार करत आहेत. कोणतीही समस्या नाही" असं रिवाबा यांनी म्हटलं आहे. तसेच "काही अडचण नाही. एकाच कुटुंबात वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असू शकतात. जामनगरच्या जनतेवर माझा विश्वास आहे, आम्ही सर्वांगीण विकासावर भर देणार असून, यावेळीही भाजपा चांगल्या फरकाने विजयी होईल" असं देखील म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेची संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
#GujaratAssemblyPolls | There's no difficulty. There can be people of different ideologies in same family. I've trust in people of Jamnagar, we will focus on overall development, and this time as well BJP will win with a good margin: BJP's Rivaba Jadeja after casting her vote pic.twitter.com/P4Il0MLaDo
— ANI (@ANI) December 1, 2022
रिवाबा जडेजा यांनी "माझ्यासाठी काहीही अवघड नाही. एकाच कुटुंबातील लोक भिन्न विचारसरणीचे आहेत, ही पहिलीच वेळ नाही. जनतेचा पाठिंबा भाजपाला आहे, असे मला वाटते. माझे सासरे आणि नणंद त्या पक्षाचे सदस्य म्हणून प्रचार करत आहेत. कोणतीही समस्या नाही" असं म्हटलं आहे.
Gujarat | Nothing is difficult for me. It isn't first time people in same family are coming from different ideologies. I believe people's support is with BJP. My father-in-law & sister-in-law are campaigning as members of that party. There aren't any issues: Rivaba Jadeja, BJP pic.twitter.com/8TacZFWx47
— ANI (@ANI) November 30, 2022
बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करून जडेजाची भावनिक साद
रवींद्र जडेजाने बाळासाहेबांच्या भाषणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, "माझे म्हणणे एवढेच आहे की जर तुम्ही नरेंद्र मोदीला बाजूला केले तर गुजरात तुमचा गेला. हे माझे वाक्य मी अडवाणींपाशी बोललेलो आहे." रवींद्र जडेजाने बाळासाहेबांचा हा जुना व्हिडीओ शेअर करून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
रिवाबा यांच्यासाठी मोठ्या नेत्याचे कापले तिकीट
भाजपने जामनगर उत्तरमधून भारतीय क्रिकेटपटू आणि जामनगरचा रहिवासी असलेल्या रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. रिवाबा यांना राजकारणाचा किंवा निवडणूक लढविण्याचा कोणताही पूर्व अनुभव नाही. विशेष म्हणजे, रिवाबा यांच्यासाठी भाजपने विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह यांचे तिकीट कापले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"