शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
2
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
3
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
4
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
5
मोठ्या तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरूवात; Sensex मध्ये ५४५, तर Nifty मध्ये १०२ अंकांची तेजी
6
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
7
घट्ट मिठी अन् प्रेमाचा वर्षाव! सूरज चव्हाणला केदार शिंदेंनी दिली खास भेटवस्तू, व्हिडीओ व्हायरल
8
ज्येष्ठ नागरिकांना लोनची गरज पडली तर करावं? 'हे' ४ पर्याय बनू शकतात 'संकटमोचक', जाणून घ्या
9
गौरी योग: ७ राशींना दिवाळीपूर्वी मोठे लाभ, गुंतवणुकीत नफा; अपार यश, शुभ-सौभाग्याचा काळ!
10
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
11
पहिल्या घटस्फोटावर नीलम कोठारीने पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाली, "त्याने मला माझी ओळख..."
12
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
13
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
14
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?
15
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
16
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
17
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
18
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
19
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
20
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर

मी पंतप्रधानांच्या आईला रांगेत उभं राहूच दिलं नसतं - आझम खान

By admin | Published: November 16, 2016 11:19 AM

पंतप्रधानांची आई नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या आहेत हे कळलं असतं, तर मी स्वत: रांगेत उबं राहून त्यांना नोटा बदलून दिल्या असत्या, असे सपा नेते आझम खान म्हणाले.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. १६ - काळ्या पैशाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला देशवासियांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या या निर्णयानंतर अनेक लोक  नोटा बदलून घेण्यासाठी बँकाबाहेर रांगेत उभे आहेत. सर्वसामन्यांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांनीही काल बँकेबाहेर रांग लावून नोटा बदलून घेतल्या. त्यांच्या या कृतीचे अनेकांना कौतुक केले तर काहींनी त्यावर टीकाही केली. 
वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनीही या मुद्यावर भाष्य केले आहे. ' पंतप्रधानांची आई बँकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढणार आहे, हे माहिती असते तर मी नक्कीच त्यांची मदत केली असती' असे त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ' पंतप्रधान मोदींची आई नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या आहेत हे मला माहीत असतं, तर मीच रांगेत उभं राहून त्यांना पैसे काढून दिले असते. पण त्यांना असं रांगेत (ताटकळत) उभं राहू दिलं नसतं' असे ते म्हणाले. यावेळी आझम खान यांनी बँकेत नोटा बदलण्यासाठी गेलेल्यांच्या बोटावर शाई लावण्याच्या सरकारच्या निर्णयावरही भष्य केले. ' जे लोक बँकेत काळा पैसा बदलून घेण्यासाठी येत आहेत, त्यांच्या चेह-यालाच काळं फासलं पाहिजे. म्हणजे ते पुन्हा घराबाहेर पडण्याचा विचारही करू शकणार नाहीत' असेही आझम खान यांनी नमूद केले. 
गांधी नगरमधील रायसेन परिसरातील 'ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स' येथे पंतप्रधानांच्या आई हीराबेन यांनी चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा रांग लावून बदलून घेतल्या.  बँकेबाहेर सर्वसामान्यांप्रमाणे रांग लावून हीराबेन यांनी त्यांचा मुलगा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. हीराबेन यांनी 4,500 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्या.