ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ११ - उद्योगपती विजय मल्ल्या यांनी मी भारत सोडून पळालो नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. मी आंतरराष्ट्रीय उद्योगपती आहे, त्यामुळे मी अनेकदा भारताबाहेर प्रवास करतो. मात्र मी भारताबाहेर पळालेलो नाही, मी फरार नाही असं विजय मल्ल्या यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे. भारतीय खासदार या नात्याने मी कायद्याचा पूर्ण आदर करतो, आपली न्यायव्यवस्था आदरणीय आहे. मात्र मिडियाने ट्रायल घेऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे.
विजय मल्ल्या देश सोडून पळून गेल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. विजय मल्ल्या लंडनला पळून गेल्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असताना संसदेत गुरुवारी त्याचे पडसाद उमटले. मल्ल्या यांना देशाबाहेर जाऊ देण्यामागे गुन्हेगारी कट असल्याचा आरोप काँग्रेसने केला. तर दुसरीकडे भाजपने संपुआच्याच काळात मल्ल्या यांना कर्ज देण्यात आल्याचा दावा करीत ते आमच्यासाठी ‘संत’ नाहीत असे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले.
मल्ल्यांच्या विविध कंपन्यांनी कर्ज उचलले असल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियासह १७ सार्वजनिक बँकांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात यावी याप्रकरणी याचिका केली होती. मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून गेल्याची माहिती अॅटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती. मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. सर्व बँकांचे मिळून तब्बल 7 हजार करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत.
I am an international businessman. I travel to and from India frequently. I did not flee from India and neither am I an absconder. Rubbish.— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 10, 2016
As an Indian MP I fully respect and will comply with the law of the land. Our judicial system is sound and respected. But no trial by media.— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 10, 2016
News reports that I must declare my assets. Does that mean that Banks did not know my assets or look at my Parliamentary disclosures ?— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 11, 2016