शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

"मी असं काहीच बोललो नाही..."; 'वारसा कर' वादावरून PM मोदींच्या टीके नंतर, राहुल गांधींचा पलटवार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 17:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या अमेरिकेतील वारसा टॅक्स संदर्भातील वक्तव्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशा....

वारसा कराच्या (Inheritance tax ) मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारसा कायदा ही काँग्रेसची मानसिकता असल्याचे म्हटल्यानंतर आता राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदी ज्या वक्तव्यासंदर्भात बोलत आहेत, तसे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथील पक्षाच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही कारवाई करू, असे मी अद्यापपर्यंत म्हटलेले नाही. तर मी केवळ एवढेच म्हणत आहे की, या जाणून घेऊयात किती अन्याय झाला. यावेळी राहुल गांधी यांनी I.N.D.I.A. समूहाचा विजय झाल्यास राष्ट्रीय जात सर्वेक्षण करण्यासंदर्भआतील योजनेचाही उल्लेख केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, या अभ्यासामध्ये आर्थिक आणि संस्थात्मक अहवालाचा समावेश असेल. गेल्या काही वर्षांत समाजातील विविध घटकांचा विकास कसा झाला आणि सर्व गटांसाठी सामाजिक-आर्थिक न्याय आणि समानता सुनिश्चित करण्यासाठी काय आवश्यक आहे? हे जाणण्यासाठी याची अत्यंत मदत मिळाले. 

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून काय म्हणाले होते पंतप्रधान -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या अमेरिकेतील वारसा टॅक्स संदर्भातील वक्तव्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला होता. छत्तीसगडमध्ये बोलताना ते म्हणाले होते, "राजघराण्यातील राजकुमाराच्या सल्लागाराने काही वेळापूर्वी मध्यमवर्गीयांवर अधिक कर लादले जावेत, असे म्हटले होतं. आता हे लोक एक पाऊल पुढे गेले आहेत. आता वारसा कर लावण्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पालकांकडून मिळालेल्या वडिलोपार्जित मालमत्तेवर ‘वारसा कर’ लावणार आहेत."

"जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत काँग्रेस तुम्हाला जास्त कर लावेल आणि जेव्हा तुम्ही जिवंत नसाल, तेव्हा तुमच्यावर वारसा कराचा बोजा पडेल. म्हणजेच काँग्रेसची लूट जिंदगी के साथ भी, बाद भी... ज्या लोकांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाला आपली वडिलोपार्जित मालमत्ता मानून ती आपल्या मुलांना दिली, त्यांना भारतीयांनी आपली मालमत्ता आपल्या मुलांना द्यावी, असे वाटत नाही."

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा