ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. 16 - मी सुद्धा 100 टक्के हिंदू आहे, माझं नावच सिद्ध राम आहे. पण भाजपावाल्याप्रमाणे मी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत नाही अशा शब्दात कर्नाटकचे मंत्री सिद्दरामय्या यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. दक्षिण कर्नाटकमधील सध्याच्या धार्मिक तणावाच्या संदर्भात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपाला हिंदूत्वावर फटकारलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढं ठेवून मतदारांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहे. भाजपचे काही नेते कर्नाटकचे दौरे करत आहेत. ते स्वत:ला विस्तारक म्हणवून घेतात. त्याचा अर्थ काय? हे दुसरं-तिसरं काही नसून हिंदुत्वाच्या मुद्द्याच राजकारण आहे. उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती भाजपला कर्नाटकात करायची आहे. पण कर्नाटकात ते होऊ दिलं जाणार नाही, असही सिद्दरामय्या म्हणाले. वरुणा मतदार संघातून आपल्या मुलाला तिकीट देण्याच्या प्रश्नवर ते म्हणाले की, याचा निर्णय हायकंमाडकडून झाला आहे. यतिंद्र 2008 पासून वरुणाचा विधायक आहे. याळेळी सिद्दरामयांनी माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी वरही टीका केली. राजकारणातून संन्यस घेतल्यानंतर मैसूरमध्ये राहणार असल्याचा खुलासा यावेळी त्यांनी केला. पण राजकारणातून सन्यास कधी घेणार यावर त्यांनी मौन स्विकारले.
भाजपाप्रमाणे मी लोकांमध्ये फूट पाडत नाही - सिद्दरामय्या
By admin | Published: July 16, 2017 6:31 PM