नवी दिल्ली: कांद्याचे दर वाढल्यानं अनेकांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. यावरुन विरोधकांनी संसदेत मोदी सरकारला धारेवर धरलं. कांद्याच्या उत्पादनात झालेली घट आणि त्यामुळे कांद्याचे वाढलेले दर यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर मी फार कांदा, लसूण खात नाही. माझ्या कुटुंबातही कोणी फार कांदा, लसूण खात नाही, असं उत्तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं. देशभरात कांद्याचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर परिणाम झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर चढेच राहिले आहेत. येत्या काही दिवसात ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावरुन खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला प्रश्न विचारले. तुम्ही कांदा खाता का, असा सवाल सुळेंनी विचारला. त्यावर मी फार लसूण, कांदा खात नाही. आमच्या कुटुंबातही कांदा, लसूण फारसा खाल्ला जात नाही, असं उत्तर निर्मला सीतारामन यांनी दिलं.
देश कांद्याच्या दरानं हैराण अन् अर्थमंत्री म्हणतात; मी फार कांदा, लसूण खात नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 9:08 AM