नवी दिल्ली : निवडणूक लढविण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे कारण देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास भाजप नेतृत्वाला नकार दिला. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून उमेदवारी देण्याची तयारी दाखविली होती.
सीतारामन म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक लढविण्याच्या भाजप नेतृत्वाच्या प्रस्तावावर मी सात ते दहा दिवस विचार केला. त्यानंतर मी नकार दिला. मी आंध्र प्रदेश की तामिळनाडूमधून उभे राहावे हाही एक प्रश्न होता. उमेदवार जिंकून येण्यासाठी अनेक निकष लावले जातात. अशा गोष्टी मला जमणे शक्य नव्हते. भाजप नेतृत्वाने माझे म्हणणे मान्य केले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.