केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या उत्तर प्रदेशातील अमेठीतून खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी या जागेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. भारताच्या लोकशाही इतिहासात प्रथमच एका राष्ट्रीय पक्षाच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षाचा त्यांच्या कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात पराभव झाला.
“राहुल गांधी हे अत्यंत प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील आहेत. याचं त्यांच्यावर दडपण आहे. एक आशा आहे. मी एक सामान्य कुटुंबातील आहे. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा आईवडिलांकडे १५० रुपयांपेक्षा अधिक पैसे नव्हते. मी पहिल्यांदा १९९८ मध्ये वांद्र्यातील मॅकडोनाल्डमध्ये नोकरी केली. तिकडे १५०० रुपये मिळत होते. अशा महिलेकडून पराभव झाल्यानंतर त्या व्यक्तीला स्मार्ट व्हायला हवं,” असं स्मृती इराणी म्हणाल्या. बुधवारी बिझनेस टुडेच्या 'द मोस्ट पॉवरफुल वुमन इन बिझनेस अवॉर्ड्स' या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.
… तेव्हा उत्तर देणारच“कोणत्याही महिलेवर काही वक्तव्य तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि तुमचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी केलं जातं. तुम्ही पुन्हा उभं राहू नये यासाठी केलं जातं. परंतु फरक इतका आहे की जेव्हा माझ्यावर निशाणा साधला जातो तेव्हा भाऊ-बहिण आणखी एका जागेवरून पराभून व्हावे याची मी खात्री करते,” असंही त्या म्हणाल्या.
“२०१९ मध्ये माझ्यावर टीका केली गेली होती आणि ज्यानं ती वाईट टीका केली होती त्याला एकप्रकारे प्रमोशनच मिळालं होतं. परंतु त्यानंतर अमेठीत निवडणुका झाल्या आणि काँग्रेसच्या पाच पैकी चार जागांवरील डिपॉझिटही जप्त झालं. कारण ते भाऊ-बहिण ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त व्हावं याची मी खात्री केली. दुर्देवानं पाचव्या सीटपर्यंत पोहोचू शकलो नाही. परंतु यावेळी ती पाचवी सीटही जाईल अशी अपेक्षा करते,” असं स्मृती इराणी म्हणाल्या.मला स्वत:ला डिफाइन करण्यासाठी व्हॅलिडेशनची गरज नाही. मी दर पाच वर्षांनी आपल्या लोकांमध्ये जाऊन मतं मागेन. जे काम केलंय त्यासाठी मतं मागणार असल्याचं त्या म्हणाल्या.
… ते ४ वर्षात केलं“क्योंकि सास भी कभी बहू थी ची तुलसी म्हणून कधी मतं मागत नाही. परंतु आपल्या क्षेत्रात आपण केलेल्या कामासाठी मतं मागेन. चाळीस वर्षांपूर्वी आपल्या क्षेत्रात वैद्यकीय कॉलेजचं आश्वासन देण्यात आलं. या चाळीस वर्षात एकच कुटुंब या ठिकाणी सत्तेत होतं. परंतु वैद्यकीय कॉलेज बनलं नाही. मी अमेठीत चार वर्षांपासून खासदार आहे. जे चाळीस वर्षात झालं नाही, ते चार वर्षात होतंय. आता तिकडे कॉलेज बनतंय,” असंही त्या म्हणाल्या.