नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने सोशल मीडियावरून आपली निवृत्ती जाहीर केली. यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. धोनीने वयाच्या 39 व्या वर्षी तर रैनाने अवघ्या ३३व्या वर्षीच निवृत्ती जाहीर केली आहे.
या दोघांच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना पत्र लिहिले आहे. जसे पत्र मोदींनी धोनीला लिहिले होते, तसेच पत्र त्यांनी रैनालाही लिहिले आहे.
रैनाला लिहिलेल्या पत्रात मोदींनी म्हटले आहे, आपण एवढे युवा आहात, तरी निवृत्ती कशी घेतली. 15 ऑगस्टला आपण आपल्या आयुष्यातला अत्यंत कठीण निर्णय घेतला. यासाठी मी ‘निवृत्ती’ असा शब्द वापरू इच्छित नाही, कारण आपण निवृत्त होण्यासाठी फार तरूण आणि ऊर्जावान आहात. क्रिकेटच्या मैदानावर उत्तम खेळी केल्यानंतर आपण आपल्या जीवनातील पुढील डावाची तयारी करत आहात.
केवळ फलंदाज म्हणूनच नाही, तर एक गोलंदाज म्हणूनही आपण दिलेले योगदान विसरता येणार नाही. आपण कर्णधार विश्वास ठेवू शकतो, अशा प्रकारचे गोलंदाज होतात. आपले क्षेत्ररक्षण सर्वोत्तम होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही उत्कृष्ट झेल घेऊन आपण आपली छाप सोडली आहे. मैदानात आपण वाचवलेल्या धावांचा हिशोब लावायचा झालाच तर अनेक दिवस लागतील, असे मोदी म्हणाले.
खेळाडूचे कौतुक मैदानात आणि मैदानाबाहेरदेखील होते. करिअरमध्ये अनेक वेळा दुखापती आणि अन्य अडचणींचा सामना केल्यानंतरही आपण त्यावर मात केली. आपण नेहमीच टीम स्पिरीटसोबत राहिलात. वैयक्तिक विक्रमांसाठी नाही, तर संघ आणि भारताच्या गौरवासाठी खेळलात. मैदानातला आपला उत्साह फार प्रभावी होता आणि आम्ही सर्वांनी पाहिले आहे, की प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज बाद झाल्यानंतर आपण आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम पुढे यायचा.
समाजाप्रति आपली बांधिलकी आणि करुणा आपल्या अनेक कार्यांतून दिसते. आपण महिला सशक्तीकरण, स्वच्छ भारत आणि गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतलात. मला आनंद आहे की आपण भारताच्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले आहात.
रैनाने असे मानले आभार - पंतप्रधान मोदींनी लिहलेले पत्र सुरैश रैनाने सोशल मीडियावर शेअर करत दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत. यात त्याने म्हटले आहे, आम्ही देशासाठी खेळत असताना खूप मेहनत घेतो. या देशातील लोकांच्या प्रेमापेक्षा दुसरी कोणतीही प्रेरणा नाही. जेव्हा देशाचे पंतप्रधान आपल्यासाठी असे बोलतात, तेव्हा ती गोष्ट फार मोठी असते. मोदीजी प्रेरणा देणारे शब्ध आणि शुभेच्छा यासाठी धन्यवाद. मनापासून त्याचा स्वीकार करतो. जय हिंद!
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVaccine News : भारतात होणार Sputnik V कोरोना लशीचे उत्पादन? रशिया करतोय अशी 'प्लॅनिंग'
आता फक्त पाण्याने होणार कोरोनाचा खात्मा! केवळ फवारण्याची गरज, ICMRनंही दिली मंजुरी
CoronaVirus News: चीननं 'या' देशात मजूरांनाच टोचली कोरोना लस, वाद पेटला
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!
CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर