शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

"मला अत्यंत दुःख झालं..."; केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात अण्णा हजारे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 1:51 PM

Anna Hazare reaction over Arvind Kejriwal arrest : राळेगण सिद्धि येथून निवेदन जारी करत हजारे म्हणाले, 'मला अत्यंत दुःख झाले आहे की, अरविंद केजरीवाल सारखा माणूस, जो माझ्यासोबत काम करत होता, आम्ही दारूबंदीसाठी आवाज उचलला होता, तो आज मद्य धोरण बनवत आहे. याचे मला वाईट वाटले.

दिल्लीचे मुख्यंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आली. ईडीने गुरुवारी त्यांना अटक केली. यासंदर्भात आता समाज सेवक अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या अटकेला, त्यांच्या कर्माचे फळ म्हटले आहे. एवढेच नाही, तर कधीकाळी केजरीवाल दारू बंदी विरोधातही आपल्या सोबत होते आणि आता ते मद्य धोरण बनवू लागेल आहेत, असे म्हणत अण्णा यांनी दुःखही व्यक्त केले आहे.

राळेगण सिद्धि येथून निवेदन जारी करत हजारे म्हणाले, 'मला अत्यंत दुःख झाले आहे की, अरविंद केजरीवाल सारखा माणूस, जो माझ्यासोबत काम करत होता, आम्ही दारूबंदीसाठी आवाज उचलला होता, तो आज मद्य धोरण बनवत आहे. याचे मला वाईट वाटले. पण करेल काय? सत्ते समोर काही चालत नाही. अखेर त्यांना जी अटक कण्यात आली ती त्यांच्या कृती मुळे झाली. आम्ही हे बोललो नसतो तर अटकेचा प्रश्नच नव्हता. जे झाले आहे, ते कायदेशीर पणे, जे व्हायचे ते होईल. ते सरकार बघेल. विचार करेल.'

कुमार विश्वास यांचा निशाणा -केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर, कुमार विश्वास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X)वर "कर्म प्रधान विश्व रचि राखा। जो जस करहि सो तस फल चाखा॥" या गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसच्या ओळी पोस्ट केल्या आहेत. या चौपाईच्या माध्यममाने गोस्वामी तुलसीदास कर्माचे महत्व विशद करतात. "हे विश्व कर्म प्रधान आहे, जी व्यक्ती जसे करते, तिला तसे फळ मिळते." असा या चौपाईचा अर्थ आहे. या ओळींच्या माध्यमाने कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल हे अन्ना आंदोलनातील सहकारीही होते.

केजरीवाल कसे अडकले? -

मनीष सिसोदिया यांच्या जामिनासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, या प्रकरणी आपण संपूर्ण पक्ष अथवा पक्षाच्या प्रमुखांनाही समन पाठवणार का? असा प्रश्न न्ययालयाने ईडीला विचारला होता. यावर, विचार करू, असे सॉलिसिटर जनरल यांनी म्हटले होते. यानंतर, ईडीने अरविंद केजरीवाल यांना पहिले समन पाठवले होते. दिल्ली अबकारी नीती प्रकरणाशी अरविंद केजरीवाल यांचा संबंध होता, असा ईडीचा आरोप आहे. ईडीच्या मते, मद्य नीती लागू करण्यात कथित भ्रष्टाचार झाला आहे. जो 338 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेArvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयliquor banदारूबंदी