ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 07 - अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांच्या गटाकडून माझ्यावर दबाव आणला जात आहे. तसेच मला तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचा जबरदस्तीने राजीनामा द्यावा लागला, असे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी सांगितले.तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी येथे सुरू असलेल्या राजकारणाबाबत मौन सोडले. आज रात्री साडेनऊच्या सुमारास ओ. पनीरसेल्वम जयललिता यांच्या मरीना बीच येथील स्मारकाजवळ आले. याठिकाणी त्यांनी जयललिता यांच्या स्मारकाला आदरांजली वाहिली. यानंतर येथील उपस्थित पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी अम्माच्या स्मारकाजवळ आलो आणि शांतपणे ध्यान केले. तामिळनाडूतील जनतेला सत्य समजणे गरजेचे आहे. मी सत्य सांगू इच्छितो. ज्यावेळी अम्मा रुग्णालयात होत्या, त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की पार्टी आणि सरकार वाचविण्याची जबाबदारी पार पाडेन. जर पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि जनतेनं पाठिंबा दिल्यास मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा परत घेईन. मात्र, मी मुख्यमंत्रिपदावर असताना माझा सतत अपमान करण्यात येत होता. तसेच व्ही. के. शशिकला यांच्या गटाकडून माझ्यावर दबाव आणला जात आहे, असे ओ. पनीरसेल्वम म्हणाले.
Chennai: Tamil Nadu CM O.Panneerselvam paid homage to Jayalalithaa at her memorial on Marina Beach, earlier tonight. pic.twitter.com/NO0uqJeHno— ANI (@ANI_news) February 7, 2017