वायनाड (केरळ) - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरून रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचे नेमके कारण सांगितले. भारत देश हा एकसंध आहे. हा संदेश देण्यासाठी मी केरळमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असे हे म्हणाले. प्रसारमाध्यमांश संवास साधताना राहुल गांधी यांनी सांगितले की, ''भारत देश हा एकसंध देश आहे, हा संदेश देण्यासाठी मी केरळमध्ये आलो आहे. नरेंद्र मोदी आणि आरएसएसकडून येथील भाषा आणि संस्कृतीचा अपमान कण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र दक्षिण भारत केंद्रस्थानी यावा, असा संदेश देण्याचा माझा प्रयत्न आहे.
...म्हणून घेतला वायनाड येथून लढण्याचा निर्णय, राहुल गांधींनी सांगितले दक्षिण स्वारीचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:06 IST