शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 9:09 PM

Love Triangle Crime News: लव्ह ट्रँगलमधून एका ६५ वर्षीय वृद्धाची त्याच्या ३५ वर्षीय प्रेयसीने हत्यया केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

लव्ह ट्रँगलमधून एका ६५ वर्षीय वृद्धाची त्याच्या ३५ वर्षीय प्रेयसीने हत्यया केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा करताना पोलिसांनी सांगितले की, लव्ह ट्रँगलमधून घनश्याम कुशवाहा यांची हत्या करण्यात आली होती. घनश्याम यांची प्रेयसी असलेल्या सोनिया हिने तिचा दुसरा प्रियक रोहित याच्यासोबत मिळून घनश्याम यांची हत्या केली. 

पोलिसांना ७ ऑक्टोबर रोजी बनगया महामार्गावर एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. तपास केल्यानंतर मृताची ओळख घनश्याम कुशवाहा, अशी असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांना तपासाची एकेक साखळी जोडत सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये मृत घनश्याम यांच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष दिसून आला. त्यांची ओळख सोनिया आणि रोहित यांच्या रूपात झाली. 

या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातील त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला. सोनियाने सांगितले की, मी घनश्यामकडे असलेले पैसे आणि त्याला मिळत असलेल्या पेन्शनच्या मोहाने त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करत होते. मात्र घनश्याम माझ्यावर सोबत राहण्यासाठी दबाव आणू लागला. त्यानंतर मी रोहितसोबत मिळून त्याची हत्या करण्याचा डाव आखला. 

हत्येच्या रात्री सोनिया आणि रोहित घनश्याम यांना एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली. तिथे रोहितने घनश्याम यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर या दोघांनीही त्याच्या शरीरावर तेल टाकून पेटवून दिले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले कपडे, लोखंडी सळई, आगपेटी आणि तेलाची बाटली जप्त केली. सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी