"मी उघडपणे हिंदू राजकारण करतो, त्यात अडचण काय?",हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 05:24 PM2023-11-18T17:24:07+5:302023-11-18T17:24:45+5:30
Himanta Biswa Sarma: राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नेत्यांच्या सभा, रोड शो जोरात सुरू आहेत. यादरम्यान नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपही जोरात सुरू आहेत.
राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नेत्यांच्या सभा, रोड शो जोरात सुरू आहेत. यादरम्यान नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपही जोरात सुरू आहेत. भाजपा आणि काँग्रेस दोघांकडूनही आपापल्या विजयाचे दावे केले जात आहेत. याचदरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
ते म्हणाले की, मी उघडपणे हिंदू राजकारण करतो. यामध्ये अडचण काय आहे. या देशामध्ये हिंदूचा अर्थ सबका साथ, सबका विश्वास. हिंदू भारतीय आहेत, तर या देशामध्ये हिंदू राजकारण करण्यामध्ये अडचण काय आहे. काँग्रेसला सांगा की, आम्ही हिंदू आहोत आणि हिंदूच राहू.
याआधी ते प्रतापगड येथे म्हणाले होते की, तुम्ही पाहू शकता की, संपूर्ण राजस्थानमध्ये शास्त्रीय पद्धतीने लूट करण्यात आली आहे. जर आपण अर्थव्यवस्था आणि भूगोलामध्ये राजस्थान आणि आसामची तुलना केली तर आसाममध्ये भाजपाचं सरकार आहे. आम्ही लोकांना ९७-९८ रुपये प्रति लीटर दराने पेट्रोल देत आहोत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये हा दर ९४-९५ रुपये आहे. राजस्थानमध्ये १०८ ते ११० रुपये आहे. असं असताना प्रियंका गांधी सांगतात की आम्ही गरीबांसोबत आहोत म्हणून, असा टोला हिमंता बिस्वा सरमा यांनी लगावला होता.