शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

सीबीआय चौकशीला मी तयार एकनाथराव खडसे : लाच प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By admin | Published: May 16, 2016 12:38 AM

जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय? त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारे चौकशी करावी. या प्रकरणाची आपल्याला देखील उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय? त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारे चौकशी करावी. या प्रकरणाची आपल्याला देखील उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तत्कालिन मंत्र्यांनी जमीन नाकारली
खडसे म्हणाले, तक्रारदार डॉ.रमेश जाधव यांनी २००८ व २००९ मध्ये जमिनीच्या मागणीसाठी शासनाकडे अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळला होता. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी तत्कालिन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पिटीशन अर्ज केला. त्यांनी सवार्ेच्च न्यायालयाचा दाखला देत जमीन देण्यास नकार दिला. तसेच २०१४ मध्ये ही जमिन परिवहन खात्याला देण्याबाबत आदेश दिले. त्या आशयाचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देत ती जागा परिवहन खात्याकडे वर्ग केली.
२५ फेब्रुवारी रोजी आपण जमीन नाकारली
दरम्यानच्या काळात डॉ.जाधव यांनी आपल्याकडे रिव्ह्यू पिटीशन दाखल केली. त्यात मागील मंत्री, अधिकारी यांनी संगनमत करीत जमीन नाकारल्याचा आरोप केला. महसूल मंत्री म्हणून आपल्याला अर्ध न्यायीकचा दर्जा आहे. ही जमीन गायराणाची आहे. जमीा आर.टी.ओ.खात्याकडे वर्ग केली आहे. तसेच परिवहन विभागाने या जमिनीची ५ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे भरणा केली असल्याने २५ फेब्रुवारी रोजी जमीन देता येत नसल्याचा निर्णय आपण दिला. हा निर्णय ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी तक्रारदार यांना कळविला. त्यानंतर एप्रिल महिन्यात तक्रारदार यांनी लाचची मागणी केल्याचा आरोप केला.
तक्रारदार हा विकृत
तक्रारदार याने सुरुवातीला १५ कोटींच्या लाचची मागणीचा आरोप केला. नंतर ३० कोटी मागितल्याचा आरोप केला. रेडीरेकनरच्या दरानुसार ज्या जमिनीची किंमत ५ कोटी आहे. त्यासाठी ३० कोटींची मागणी होईल कशी असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. तक्रारदाराने केलेले आरोप व पूर्व इतिहास पाहता तो विकृत असल्याचे लक्षात येते, असेही खडसेम्हणाले.
एक कोटीवर किती शून्य हे गजाननला माहित नाही
गजानन उर्फ गजमल पाटील हा मतदार संघातील व्यक्ती आहे. वारकरी असल्यामुळे आपल्यासोबत तो आषाढीच्या वारीमध्ये अनेकदा आला आहे. त्याची ओळख नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. गजानन याला एक कोटीवर किती शून्य आहे हे विचारल्यास सांगता येणार नाही.